
.सिंहस्थ कुंभमेळा हरितकुंभ संकल्पने अंतर्गत वृक्षारोपण करताना डॉ. उत्तमराव डेरले, प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे, समवेत वनपरिक्षेत्र अधिकारी नवनाथ गांगोडे, वनरक्षक अधिकारी श्रीमती कल्पना पाईकराव, उपप्राचार्य डॉ. प्रवीण ढेपले, डॉ. सुसान लॉरेन्सिया, प्रा. अभय वडघुले, डॉ. महेश बनकर, प्रा. भाऊसाहेब मुंतोडे, प्रा. योगेश गीते, प्रा. प्रकाश आहेर, चेतन कुंदे, कार्यालयीन अधीक्षक संजय गायकवाड व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी
निफाड( प्रतिनिधी )१६ जुलैमराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कर्मवीर गणपत दादा मोरे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय निफाड येथे जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक, निफाड वनविभाग कार्यालय, राष्ट्रीय सेवा योजना या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने ” हरित कुंभ २०२५ ते २०२७ ” या अंतर्गत बुधवार दि. १६ जुलै रोजी सामूहिक वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शालेय विकास समितीचे अध्यक्ष डॉ. उत्तमराव डेरले आणि प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे यांच्या शुभहस्ते ५१ वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने शिशु, अर्जुन सादडा, कॅज्युअल पिनाटा, सिताफळ, आंबट चिंच, कडुनिंब, जांभूळ, नारळ, आंबा, सीताफळ, चिकू, या रोपांची प्रामुख्याने लागवड करण्यात आली. वृक्षारोपणाच्या वेळी वनपरिक्षेत्र अधिकारी नवनाथ गांगोडे, वनरक्षक अधिकारी श्रीमती कल्पना पाईकराव, उपप्राचार्य डॉ. प्रवीण ढेपले, डॉ. सुसान लॉरेन्सिया, प्रा. अभय वडघुले, डॉ. महेश बनकर, प्रा. भाऊसाहेब मुंतोडे, प्रा. योगेश गीते, प्रा. प्रकाश आहेर, चेतन कुंदे, कार्यालयीन अधीक्षक संजय गायकवाड व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे यांनी माहिती दिली की, निफाड महाविद्यालयात यावर्षी १०,०००/- संख्येची रोपवाटिका तयार करण्यात आली असून त्यातून प्रत्येक विद्यार्थ्याला एक रोप दिले असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या घरी व परिसरात वृक्षारोपण केले आहे, तसेच महाविद्यालयात माझा वाढदिवस माझे झाड, आणि विठ्ठलाचे झाड या संकल्पनेतून महाविद्यालय परिसरात सर्व प्राध्यापक प्राध्यापिका व शिक्षकेतर सेवक आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी असे एकूण ५३२ रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे.याचा फायदा पर्यावरण पूरक व हरित वातावरण निर्माण करण्यासाठी होणार असून, विद्यार्थ्यांमध्ये वृक्ष संवर्धनासाठी याद्वारे जनजागृतीचे मोठे काम होणार आहे, वृक्ष संवर्धन चळवळीत सर्वांनी सहभागी होऊन पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी आपले योगदान द्यावे असे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वीततेसाठी सर्व प्राध्यापक प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले
