

कासारी (प्रतिनिधी): आज दिनांक 16 जुलै 2025 रोजी कासारी जिल्हा परिषद शाळेमध्ये जागतिक सर्प दिनानिमित्ताने सापाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देऊन समज गैरसमज आणि सापांच्या प्रजातींबद्दल तसेच विषारी बिनविषारी सापाबद्दल माहिती देण्यात आली अनावधानाने चुकून नकळत सर्पदंश झालाच तर प्रथमोपचार कसा करावा याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना वन्यजीव संरक्षण संस्था नांदगाव तालुका अध्यक्ष सर्पमित्र प्रभाकर निकुंभ आणि मंगेश आहेर यांनी करून दाखवले त्याचबरोबर सहाय्यक वनसंरक्षक चांदवड श्री शिवाजी सहाने साहेब आणि नांदगाव वनपरिक्षेत्रधिकारी हेमंत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हरितकुंभ संकल्पने अंतर्गत… सामूहिक वृक्षारोपणाचा कार्यक्रम देखील जिल्हा परिषद शाळा कासारी येथे वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला प्रसंगी वनपाल… दीपक वडगे ,नवनाथ बिन्नर,आण्णा टेकनर ,अमोल पवार ,रामचंद्र गंडे सर्पमित्र मयुर हसवाल. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी उपस्थित होते
