
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९६९ वा दिवस आपले विचार, तत्त्वज्ञान भारतापुरतेच मर्यादित राहिलेले नसून, आपली इच्छा असो वा नसो ते आपल्या देशाबाहेर जात आहेत. इतर देशांच्या वाङ्मयात प्रविष्ट होत आहेत. देशादेशातून त्यांना विशिष्ट स्थान प्राप्त होत आहे आणि काही ठिकाणी तर त्यांना असामान्य महत्त्व प्राप्त होत आहे. याचे एकच महत्वाचे कारण म्हणजे धर्म व तत्त्वज्ञान हे मानवी मनाला आकर्षित करणाऱ्या सर्व विषयाहून अधिक श्रेष्ठ व उदात्त असे विषय आहेत.
*स्वामी विवेकानंद…*
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
★ भारतीय सौर २५ आषाढ शके १९४७*
★ आषाढ वद्य /कृष्ण ७
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ गुरुवार दि. १७ जुलै २०२५ ★ १७९० स्काॅटिश तत्ववेत्ता, अर्थशास्त्राचे जनक अॅडॅम स्मित यांचा स्मृतीदिन.
★ १९३० नाशिक येथील सुप्रसिध्द कवी, दलित साहित्यिक बाबूराव बागूल यांचा जन्मदिन.
★ २०१२ समाजवादी नेत्या, लोकसभेच्या सदस्या खासदार मृणाल गोरे यांचा स्मृतीदिन.
