
नाशिक.(प्रतिनिधी ) |मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू मराठा हायस्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ मधिल शालेय मंत्रीमंडळ स्थापना करण्यात आली.प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडप्रक्रिया पार पडली.शाळा व विद्यार्थी यांच्यातील महत्वाचा दुवा व विद्यार्थ्यांना लोकशाहीचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करता यावा,विद्यार्थ्यांमधून भविष्यात सक्षम नेतृत्व उदयास यावे,आजच्या विद्यार्थ्यांमधूनच उद्याची भावी पिढी तयार होत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावेत, त्यांना नेतृत्व करण्याचे कौशल्य विकसित होणे गरजेचे असते. तसेच बालवयातच लोकशाही मूल्यांची रुजवणूक विद्यार्थ्यांमध्ये होणे अपेक्षित असते. लोकशाहीचे शिक्षण प्रत्यक्ष कृतीने समजण्यासाठी निवडणुकीचे सर्व निकष समोर ठेवून मंत्री निवडण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजावण्यात आली.विद्यालयातील प्रत्येक वर्गातील वर्ग प्रतिनिधी या निवड प्रक्रियेत सहभागी झाले होते.त्यातील प्रत्येक मंत्रीपदासाठी इच्छुक उमेदवारांना संधी देण्यात आली.सर्व वर्ग प्रतिनिधींनी मतदानाचा हक्क बजावत निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली.त्यात
निवडून आलेले पदनिहाय विद्यार्थी पुढीलप्रमाणे
पंतप्रधान – गायत्री गहिवड
उपपंतप्रधान- प्रसाद कदम
अर्थमंत्री – रुतिका पाटील
उपअर्थमंत्री – चैतन्य खलाणे
आरोग्य मंत्री – श्रध्दा वाघ
उपआरोग्य मंत्री. – प्रसाद वाघ*
सांस्कृतिक मंत्री – स्नेहल गुंजाळ
उप सांस्कृतिक मंत्री-वैष्णव आहेर
क्रीडा मंत्री – राघव माळी
उपक्रीडा मंत्री – पायल खर्डे
स्वच्छता मंत्री – श्रावणी दातीर
उपस्वच्छता मंत्री – आर्यन पाटील
सहलमंत्री- अंजली गुरुळे
उपसहलमंत्री – प्रसाद सरदेसाई
शिक्षणमंत्री – गौरव पाटील
उपशिक्षणमंत्री – ओजस्विनी जाधव
परिपाठ मंत्री – वैष्णवी भंगाळे
उपपरिपाठमंत्री. -मानस संधान
शिस्त मंत्री -प्रणाली कुंभार
उपशिस्तमंत्री – ऋतुराज पाटील
वरील सर्व निवडून आलेल्या विद्यार्थांची शपथविधी घेऊन मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शिंदे यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.पंतप्रधान पदासाठी निवड झालेली विद्यार्थिनी गायत्री गहिवड हिने आपल्या मनोगतातून सर्वांचे आभार मानत शैक्षणिक वर्षात शालेय कामकाज सुरळीत चालू ठेवण्यासाठी व शिस्त गुणवत्ता टिकवण्यासाठी शालेय मंत्रीमंडळ नक्किच चांगले काम करेल असा आशावाद व्यक्त केला.मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शिंदे यांनी देखील आपल्या मनोगतातून सर्व शालेय मंत्रीमंडळाचे स्वागत करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी मेहनत घेतली.
