
आसरखेडे (प्रतिनिधी )दि. १६ जनता विद्यालय आसरखेडे येथे महाराष्ट्र शासन वन विभाग व शिक्षण विभाग यांचे वतिने “एक झाड आईचे नाव” उपक्रम अंतर्गत विद्यालयाच्या मैदानावर शालेय समिती सदस्य श्री नामदेव दिवटे विद्यालच्या मुख्याध्यापिका सौ. कापडनिस सी. आर. व ग्रामविकास अधिकारी श्रीमती गांगुर्डे मॅडम व सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे उपस्थितीत वृक्षलागवड करन्यात आली. विद्यार्थ्यांनी खड्डे खोदुन घेतले. व आसरखेडे ग्रामपंचायतीकडुन मिळालेल्या झाडांची लागवड केली.

