
अंदरसूल- मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे विद्यालयात ग्राममहसूल अधिकारी तिडके श्रीकृष्ण यांच्या हस्ते 21 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.सदर वृक्षारोपण शैक्षणिक संकुलाच्या परिसरात करण्यात आले शाळेतील विद्यार्थ्यांना वृक्षारोपण व संवर्धन कसे करावे मानवी जीवनात झाडांचे महत्व आहे सर्वांनी आपल्या घरी ,परिसरात वृक्षारोपण करावे व झाडांची काळजी घ्यावी असे आव्हान ग्राममहसूल अधिकारी यांनी केले.

तसेच वृक्षारोपण कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धनाची शपथ दिली .सदर वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी ग्राममहसूल अधिकारी तिडके श्रीकृष्ण ,प्राचार्य सचिन सोनवणे,मुख्याध्यापिका जयश्री परदेशी ,अशोक राजुळे,महेश मेहेत्रे, जाधव संतोष ,सोहम मेहेत्रे ,जितेश व्यवहारे ,दिपाली सोनवणे, सुषमा सोनवणे,सुप्रिया कुळधर , श्रेया कोटमे,खैरनार सपना,शिंदे वैशाली व विद्यार्थी व विद्यार्थिनी आदी उपस्थित होते.
