
मुळ डोंगरी (प्रतिनिधी)14 जुलै रोजी *श्री संत सेवालाल महाराज सेवाभावी संस्था संचलित सरस्वती माध्यमिक विद्यालय येथे* *युनिसेफ या संघटनेमार्फत बालविवाह* *च्या समस्येवर* एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेत या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाच्या माननीय मुख्याध्यापिका सौ बोरसे एस. एस. मॅडम यांनी स्वीकारले व युनिसेफ संस्थेच्या नाशिक विभागाच्या सदस्या श्रीमती मंडलिक मॅडम यांनी प्रमुख पाहुणे स्थान स्वीकारून बालविवाह प्रतिबंध या समस्येवर विद्यार्थी व पालक यांना उदबोधन करत संघटनेच्या अहवालानुसार अजूनही भारतात अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलींचे विवाह करण्यात येतात याचा शिक्षणावर, आरोग्यावर ,भविष्यावर गंभीर परिणाम होतात. आजही भारतात दहा लाख मुली अठरा वर्ष होण्याआधीच विवाह बंधनात अडकतात ही समस्या जागतिक पातळीवर जास्तीत जास्त असून सर्वाधिक ग्रामीण भागात गरीब कुटुंब सामाजिक परंपरांचा अभाव यामुळे मुख्य कारण आहे असे लक्षात येते म्हणूनच युनिसेफ संस्था व सरकार आणि स्वयंसेवी संस्थांना बालविवाहाच्या विरोधात ठोस उपाय योजना राबवण्याचे आवाहन केले आहे. मुलींच्या शिक्षणाला चालना देणे सामाजिक जनजागृती मोहीम आणि कठोर कायदे. संहिता लागू करणे अशा विविध उपायांची गरज असल्याचे त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.भारत सरकार”ने मुलींच्या समान हक्कासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ” ‘सुकन्या समृद्धी योजना’ यासारख्या विविध योजनांच्या माध्यमातून त्यांचे सक्षम सशक्तिकरण करण्यासाठी पावले उचलली असूनही पण आपल्याला प्रत्यक्षात त्याचा ठोस अभाव पाहावयास मिळतो ग्रामीण पातळीवर जागृतीचा अभाव असून ही समस्या नष्ट करण्यासाठी आपल्याला शालेय स्तरावरून प्रयत्न केले पाहिजे म्हणून संघटनेने प्रत्येक शाळेत जाऊन बालविवाह उद्बोधन कार्यशाळा आयोजित केली आणि त्याला आमच्या विद्यालयातील पालक व विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला व मंडलिक मॅडम यांनी मुलगा मुलगी समान ही कृती प्रत्यक्ष कृतीद्वारे करून दाखवली. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यालयातील सहशिक्षक पाटील सर यांनी केले. अशा प्रकारे ही उदबोधन शाळा संपन्न झाली या प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी पालक वर्ग उपस्थित होते.
