
जळगाव निंबायती (वार्ताहर) येथील महसूल मंडळ, ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून व प्रांत अधिकारी नितीन सदगीर व तहसीलदार विशाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महा राजस्व अभियानांतर्गत, धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान व छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांना विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच मंजूर प्रकरणी लाभार्थीना जातीचा, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड आदी शासकीय दाखल्यांचे वाटप करण्यात आले. प्रसंगी सरपंच वाल्याबाई पटांग्रे, उपसरपंच शिवाजी दुकळे, महेंद्र पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. मंडलाधिकारी श्रीमती एस.पी. महाजन, ग्राम महसूल अधिकारी श्रीमती ए .बी. कुंभकर्णे तसेच ग्राम महसूल अधिकारी देशमुख, डी. जे. चव्हाण, व्हि.व्हि.गायकवाड एस. शर्मा, कोतवाल आदींनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी गावातील जेष्ठ नागरिक, महिला, युवा बहुसंख्येने उपस्थित होते. नरेंद्र अहिरे यांनी सर्व अधिकारी व ग्रामस्थांचे आभार मानलेत.
