
नाशिक (प्रतिनिधी ) नाशिक येथे सन २०२६–२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा संदर्भात हरितकुंभ संकल्पनेअंतर्गत दिनांक १६/७/२०२५ बुधवार रोजी सकाळी ९:०० वाजता नाशिक जिल्ह्यात एकाच वेळी वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आले. त्यात वाय.डी.बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनि. कॉलेजमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला.*माझा कुंभ माझी जबाबदारी* *माझा वृक्ष माझी जबाबदारी*हे घोषवाक्य वापरून कुंभमेळा काळात पर्यावरण पूरक व हरित वातावरण निर्माण करणे

. विद्यार्थिनी मध्ये वृक्षसंवर्धनासाठी जनजागृती वाढविणे या उद्दिष्टाने यात वाय.डी.बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज नाशिक येथे ठीक ९:०० वाजता वृक्षारोपण करण्यात आले.यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रकाशजी वैशंपायन, उपाध्यक्ष प्रभाकर कुलकर्णी, स्कूल कमिटी चेअरमन रमेश महाशब्दे, सेक्रेटरी हेमंत बरकले मुख्याध्यापिका सौ.सविता कुशारे,अधिक्षिका सौ.मिना वाळुंजे यांचे मार्गदर्शन लाभले.या प्रसंगी शाळेचे उपमुख्याध्यापक राजेंद्र सोमवंशी , शाळेच्या पर्यवेक्षिका सौ.सुषमा गवारे, ग.कौ.सदस्य कैलास बागुल,सौ.भारती चंद्रात्रे, हरितसेना विभाग प्रमुख श्रीम.अर्चना गायकवाड व शाळेतील विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

