
परिक्षण :- कवियत्री विजयश्री, धुळे

बालकाव्यसंग्रह परीक्षण / समीक्षण भाग:- १”बालकांच्या अंर्तमनाचा ठाव घेणारा बालकाव्यसंग्रह”‘ बालमित्रांची छान छान गाणी ‘आदरणीय बालकवीवर्य प्रदिपगुरूजी पिंपळनेरकर यांच्या “छान छान गाणी”ह्या काव्यसंग्रहाचे परिक्षण करतांना मी कवियत्री विजयश्री, धुळे स्वत:स धन्य समजते.. कारण नवोदित कवियत्री असल्यावर त्यांच्या काव्यसंग्रहाचं परिक्षण माझ्या साठी लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखं आहे… आदरणीय गुरूजींना विविध सामाजिक संस्थानी जीवनगौरव पुरस्कारसकट विविध पुरस्कांनी गौरविले आहे यातच त्यांच्या सामजिक बांधिलकीचा परिचय होतोलहान बालकांवर संस्कार करत असताना गुरूजी त्यांच्यात लहान होवून समरस झाल्याचा प्रत्यय त्यांच्या कविता वाचल्यावर येतो. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर कासव, मोर, वाघ, सिंह, हत्तीचा मुखवटा लावलेली मानवी आकृतीने बालमनाला भावेल असच साजेसं हे पुस्तक आहे .. वडिलांचा फोटो त्यांच्यातल्या पितृभक्तीची ओळख करून देतात. बालकवितांचा अभ्यास करतानात्यांची बालमनावर संस्कार करण्याची तळमळ दिसून येते.. पूर्वीच्या पिढीतील खेळांची ओळख करून देत नविन बैठे खेळ मोबाईल गेम्सवरही आधुनिक काव्य लिहिताना त्यांची काळासोबतची सजगता लक्षात येतेसमाजातील सर्व कामे करणाऱ्या मंडळी अन आधुनिक रोबोटही मुलांना काव्यातून ओळख करुन दिलेला आहे. नविन पिढितील चिमुकल्यांना आज दूरावलेलं संस्कारी “आजीचं घर” , ड्रोन अन मोबाईलने आज सानथोरांचं व्यापलेलं विश्व बाहूली, प्राणी, पक्षी,वर्तमानपत्रे, तारे आठवड्यातील वारांची वारी, मेट्रो अशा विविध विषयांवरील अष्टपैलू लेखन त्यांच्यातील सजग शब्दकुबेराचं दर्शन घडवितो… काळानुरूप जादूई चिराग बालमनालाभावला नाही तर नवल…. आई मला छोटिशी बंदूक देना म्हणणारं बालमन आज “जादूई चिराग” मागतयं.. यातून पिढीतलं अंतर, समस्या कशा बदलल्या आहेत तेही जाणवतंआणि वारीचाही उल्लेख अध्यात्माचीरुजुवात बालमनात करतोय.. आणि “साबण साबण ” म्हणतआदरणीय गुरुजींनी फक्त देह स्वच्छ करणाऱ्या साबणास आणि वाचकास मनाच्या शुद्धतेचं, स्वच्छतेचं अन निर्मळतेचंही महत्त्व महत्वाचं आहेकारण “मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.. ” . म्हणून बालमानावर संस्कार करणाऱ्या आणि पिढींमधील जुन्या नव्याचा सुवर्णमध्य साधणाऱ्या कवितांचा हा संग्रह यथोचित चित्रांसहअतिशय सुंदर आहे… गुरुजींनी मुलांचे मनोरंजन करत ईश्वराशी आपलं नातं आपसूकच जोडलं आहे… आदरणीय गुरुजींच्या कार्यास नमन आणि खूप खूप शुभेच्छा.. असेच भरभरून कार्य ईश्वर त्यांच्याकडून करून घेवो,.. ही सदिच्छा 🙏१) बालकाव्यसंग्रहाचे नाव:- बालमित्रांची छान छान गाणी२)

कवी:- प्रदिपगुरूजी पिंपळनेरकर ( रमाईसुत)३) प्रकाशक:- हुदय प्रकाशन पन्हाळा, कोल्हापूर४) प्रकाशन दिनांक:-९ जुलै २०२५५) पृष्ठसंख्या:-१२०६) किंमत:- ₹१६०७) कवींचा संपर्क क्रमांक:-९८२३११३५९४सौ. विजयश्री, धुळे(नवोदित कवियत्री)
