
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९६७ वा दिवस लोकांच्या धर्माला धक्का न लावता, धार्मिक भावना न दुखावता त्यांचे उन्नयन घडून आणणे हे आपल्यासमोर एकच ध्येय असावे. लक्षात असू द्या की हे राष्ट्र झोपड्यांमध्ये वसलेले आहे. एखाद्या देशाचे भवितव्य तेथील लोकांच्या परिस्थितीवर अवलंबून असते. तुम्ही त्यांच्या परिस्थितीत बदल घडवून त्यांची प्रगती घडवून आणू शकतात का? त्यांच्या जन्मजात अध्यात्मिक स्वभावाला धक्का न पोहोचवता तुम्ही त्यांना त्यांचे विलुप्त झालेले व्यक्तिमत्व परत मिळवून देऊ शकतात का? त्यांना वर येण्याची संधी उपलब्ध करून देऊ शकतात का?
स्वामी विवेकानंद…
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २३ आषाढ शके १९४७*
★ आषाढ वद्य /कृष्ण ५
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ मंगळवार दि. १५ जुलै २०२५ ★ १९०३ स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, तामिळनाडूचे मुख्यमंत्री, खासदार के. कामकाज यांचा जन्मदिन.
★ १९२७ सुप्रसिध्द व्याख्याते, लेखक, तत्वज्ञ, मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य शिवाजीराव अनंतराव भोसले यांचा जन्मदिन.
★ १९३२ लेखक, विद्वान, टिकाकार नरहर कुरुंदकर यांचा जन्मदिन.
★ १९६७ सुप्रसिध्द अभिनेते, गायक नारायण श्रीपाद राजहंस तथा “बालगंधर्व” यांचा स्मृतीदिन.
