
नांदगाव (प्रतिनिधी):- ‘बी द चेंज’ या सामाजिक संस्थेचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 हा सन्मान सोहळा शिर्डी येथे साई दरबारी आयोजित करण्यात आला होता. मनोज बन्सी डोंगरे यांनाही यावेळी राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी राज्य आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री डॉ. पोपटराव पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील 36 शिक्षकांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या व्यतिरिक्त संस्थेने 20 अतिरिक्त शिक्षकांचीही निवड करून त्यांनाही शाल व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

या कार्यक्रमात न्यायडोंगरीचे सुपुत्र मनोज बन्सी डोंगरे यांनाही यावेळी राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ते श्रीक्षेत्र नस्तनपुर जवळील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरखेड ता.नांदगाव येथे कार्यरत आहेत. शिक्षक म्हणून काम करत असताना आपल्या कामाचा ठसा उमटविला. त्याचेच फळ म्हणून त्यांना हा पुरस्कार मिळाला. न्यायडोंगरी केंद्रासह नांदगाव मधून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षा होत आहे.
