
वेहळगाव ( प्रतिनिधी). जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंगळणे येथे वसंतराव नाईक शिक्षक संस्था वेहेळगाव यांच्यावतीने सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यानिमित्त उपस्थित व्ही.एन. नाईक शिक्षण संस्थेचे संचालक श्री टी. एम. डोंगरे सर, वेहेळगाव माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. पठाण सर, संस्थेचे शिक्षणाधिकारी श्री जयंत भाबड सर, श्री भारत भाबड सर, श्रीमती आरती बुरकुल मॅडम शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ कविता पंढरीनाथ काकड, सदस्य श्री हनुमान जाधव व माजी सरपंच श्री पंढरीनाथ ताडगे हे उपस्थित होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंगळणे यांच्या वतीने सर्व मान्यवरांचे आभार मानण्यात आले.
