
ढेकू (प्रतिनिधी )ढेकू आश्रम शाळेत रक्तदान शिबिर संपन्न ग्रामोदय शिक्षण संस्था नाशिक संचलित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा ढेकू येथे ग्रामोदय शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय पोपटरावजी हिरे यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक श्री.सूर्यवंशी सर व श्री.थोरात सर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी आदरणीय पोपटरावजी हिरे यांच्या जीवनपटावर मनोगत व्यक्त केले

. व श्री.एस. एम.कामडी यांनी पप्पांनी केलेल्या भरीव कामगिरी चा आढावा मनोगतातून व्यक्त केला .स्मृतिदिनानिमित्त मालेगाव ब्लड सेंटर व ढेकू आश्रम शाळेतील सर्व कर्मचारी वृंद यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले सदरील शिबिरात गावाचे उपसरपंच श्री राजेंद्र चव्हाण, हेमराज चव्हाण यांनी स्वतः रक्तदान करून शिबिराची सुरुवात करण्यात आली आश्रम शाळेतील सर्व कर्मचारी वृंद व गावकऱ्यांनी रक्तदान करण्यात सहभाग घेतला.प्रत्येक रक्तदान करणाऱ्या रक्तदान दात्यास ब्लड बँक मालेगाव यांच्याकडून सन्मानपत्र व ट्रॉफी देण्यात आली

रक्तदान शिबिरात एकूण 25 जणांनी रक्तदान केले. त्या सर्वांचे शाळेकडून मनःपूर्वक आभार मानण्यात आले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री देवरे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री अनिल पवार सर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.
