
नाशिक (प्रतिनिधी ) दिनांक १० जुलै २०२५ वार गुरुवार रोजी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा शिरसगाव ता. त्र्यंबकेश्वर जि. नासिक या ठिकाणी इयत्ता ९ वी व १० वी च्या विद्यार्थ्यांनी *गुरुपौर्णिमेच्या* दिवसाचे औचित्य साधत गुरुजनांचे *औक्षण* करुन वंदन करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रथमतः क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले व क्रांती सुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमांना गुरुजनांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन वंदन करण्यात आले.त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या वकृत्व शैलीने गुरुची महिमाचे वर्णन करत असतांना सर्वांना मंत्रमुग्ध केले. त्यात दिक्षा मौळे या इयत्ता ८ वी च्या विद्यार्थीनींने काव्यातून गुरुजनांची महती सांगितली. या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेले गोकुळ भाऊ गारे, तालुका समन्वयक,अनुलोम, खरवड यांनी विद्यार्थ्यांच्या हस्ते गुरुजनांना वृक्षांची रोपे देऊन विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांनी कसे वागले पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शाळेचे मुख्याध्यापक दिपक भास्कर यांनी हा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी स्वतः उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन साजरा केला म्हणून अभिनंदन करत आपण सर्व विद्यार्थ्यांनी खुप अभ्यास व मेहनत करुन यशस्वी व्हावे ह्या सदिच्छा दिल्या. या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने माध्यमिक शिक्षिका सिता भोये, माध्यमिक शिक्षक सिद्धार्थ भोगले, अमोल कामडी, प्राथमिक शिक्षक योगेश्वर चव्हाण, शोभा जाधव, अधिक्षिका पुणम बावणे, अधिक्षक अरुण बागले, कनिष्ठ लिपिक किरण राऊत हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका महाले या इयत्ता १० वी च्या विद्यार्थीनीने केले.
