
नाशिक. ( प्रतिनिधी ) वार्ताहरमराठा विद्या प्रसारक समाज संचलित श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, खेडगाव येथे पालक-शिक्षक मेळावा उत्साहाने संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष मा.श्री.बाबुरावजी डोखळे पाटील, माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष मा.श्री.राजेंद्रजी पाटील ढोकरे, अभिनव बाल विकास मंदिर शालेय समितीचे अध्यक्ष मा.श्री.सोमनाथजी ठुबे, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल शालेय समितीचे अध्यक्ष मा.श्री. जयरामजी पाटील डोखळे, पंचायत समितीचे माजी सभापती मा.श्री.एकनाथजी खराटे,मा.श्री.शामराव रणदिवे, सुभाषजी पोतले,खेडगाव च्या उपसरपंच मा.कुसुमताई सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य मा.निशाताई डोखळे, मा.डॉ. सुजाता तिडके , विद्यालयाचे प्राचार्य मा.श्री.आर.आर.शिंदे, पर्यवेक्षिका श्रीमती.माळेकर मॅडम, ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख मा.श्रीमती.गोडसे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे व विद्येची देवता सरस्वती मातेच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलन करून झाली. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य मा.श्री आर.आर.शिंदे सर यांनी आपल्या प्रास्ताविकातून विद्यालयाची यशस्वी गुणवत्ता, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास साधण्यासाठीचे विद्यालयाचे भविष्यातील प्रयोजन व या विकासात पालक-शिक्षक यांची भूमिका याबाबत प्रतिपादन केले. उपस्थित बहुसंख्य पालकांच्या संमतीने व एकमताने माता-पालक संघ व सखी-सावित्री मंचातील नूतन कार्यकारणी सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.व्यासपीठावर पालक व शिक्षक यांच्यामध्ये शालेय गुणवत्ता, कला, क्रीडा,आरोग्य,शिस्त,स्पर्धा परीक्षा इत्यादी विषयांवर मुक्त चर्चा झाली बहुसंख्य पालकांनी शालेय विकासासाठी राबवायचा नवनवीन कल्पना मांडल्या. याप्रसंगी शाळेचे उपशिक्षक श्री.एस.एन.सोनवणे यांनी आपल्या मनोगतातून विद्यालयात घेतल्या जाणाऱ्या निरनिराळ्या स्पर्धा परीक्षा, उपक्रम याशिवाय शालेय विकासात पालक-शिक्षक यांची भूमिका स्पष्ट केली. उपशिक्षक श्री.बी.व्ही.खैरनार यांनी विद्यार्थी-पालक यांच्यातील मैत्रीपूर्ण नाते व बालकाच्या प्रती पालकांची नवीन भूमिका यासंदर्भात पालकांशी संवाद साधला.विद्यालयाचे क्रीडाशिक्षक मा.श्री.व्ही.डब्ल्यू.गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच शारीरिक व मानसिक विकासासाठी विद्यालयात घेतले जाणारे निरनिराळे खेळ प्रकार,त्यात विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश व भविष्यातील क्रीडा योजना याबाबत सविस्तर माहिती दिली.ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापिका मा.श्रीमती.गोडसे मॅडम यांनी विद्यार्थ्यांची शालेय उपस्थिती,अभ्यासातील सातत्य,योग्य शिष्टाचार व पालकांची जागरूकता यासंदर्भात पालकांशी संवाद साधला.पालकांनी शालेय उपक्रमात आपले योगदान देण्यासाठी नवीन व्हाईट बोर्ड शाळेस उपलब्ध होण्यासाठी भरीव योगदान दिले.त्यात उपस्थित पालक श्री.दीपकजी कावळे,श्री.बापू सोनवणे, श्री.सचिनजी रणदिवे, श्री.संजयजी डोखळे, श्री.नितीनजी पाटील, श्री.राहुलजी शेळके, श्री.साहेबरावजी रणदिवे, श्री.मनोहर चव्हाण,श्री.रतन वाघ,श्री.निवृत्ती पारधे,श्री.दिलीप लहितकर, श्री.विठ्ठल लहितकर, श्री.अंबादास भवर,श्री.गणेश जाधव, श्री.साहेबराव भवर, श्री.राजेंद्र जाधव,श्री.सचिन व्यवहारे,श्री.शाहिद पठाण, श्री.अमिन पठाण इत्यादी पालकांनी आपला दातृत्वपूर्ण सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व माध्यमिक शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.श्री.राजेंद्रजी पाटील ढोकरे यांनी पालक व शिक्षकांशी संवाद साधतांना विद्यार्थी विकासात पालक व शिक्षक हे महत्वाचे पाईक असून दोघांनीही सजग व जागरूक राहिल्यास विद्यार्थी निश्चितच आपल्या यथोचित ध्येयापर्यंत पोहोचेल असा विश्वास निर्माण केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष व उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष मा. बाबूरावजी डोखळे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विद्यालयाच्या समग्र विकासासाठी पालक-शिक्षक यांनी दुवा बनून प्रयत्न करणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे विद्यार्थीहित लक्षात घेऊन दोनही घटकांनी आपले समाजासाठी आदर्श ठरेल असे योगदान द्यावे असे प्रतिपादन केले. सदर कार्यक्रमाचे नियोजन शालेय सांस्कृतिक समिती प्रमुख श्रीमती.एन.ए.जाधव व समिती सदस्यांच्या सहकार्याने करण्यात आले. कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या कलाशिक्षिका श्रीम.सविता पवार यांनी उत्कृष्ट फलक लेखन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.श्री.एस.एन.सोनवणे यांनी केले. आभार प्रदर्शन विद्यालयाच्या पर्यवेक्षिका मा. श्रीमती.माळेकर मॅडम यांनी केले. पालक शिक्षक मेळाव्या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, पालक, ग्रामस्थ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
