
सध्या महाराष्ट्राच्या काव्यप्रांतात अतिशय चर्चेचा विषय झालेल्या कवितेच्या घराच्या उपक्रमात एक नव्या व विशेष अशा उपक्रमाची भर पडली आहे. कवितेसाठी वाहिलेल्या शेगांव ( बु ), त. वरोरा जि. चंद्रपूर येथील कवितेच्या घरात महाराष्ट्रातील कवींच्या दर्जेदार कवितासंग्रहाचा सन्मान होणार आहे. या सन्मानार्थ तीन पुस्तकांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. *कवितेच्या घराचे तीन पुरस्कार*१ ) बापुरावजी पेटकर कवितासंग्रह पुरस्कार ( डॉ. माधुरी मानवटकर, चंद्रपूर यांच्यातर्फे ५००० रूपये रोख, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह )२ ) बापुरावजी पेटकर गझलसंग्रह पुरस्कार ( श्रीकांत पेटकर, कल्याण यांच्यातर्फे ५००० रूपये रोख, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह )३ ) बापुरावजी पेटकर बालकवितासंग्रह पुरस्कार ( किशोर पेटकर, नागपूर यांच्यातर्फे ५००० रूपये रोख, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह )कवींनी दि. ०१ जानेवारी २०२४ ते ३० जुलै २०२५ या काळात प्रकाशित झालेल्या ( प्रथम आवृत्ती ) आपल्या कवितासंग्रहाच्या / गझलसंग्रहाच्या / बालकवितासंग्रहाच्या तीन प्रती *प्रा. डॉ. प्रमोद नारायणे, ( कार्यवाह, कवितेचे घर ) शाहू ले आऊट, प्रियदर्शिनी महिला महाविद्यालयाजवळ, वर्धा ४४२००१* या पत्त्यावर दि. ८ ऑगस्ट २०२५ पर्यंत पाठवाव्या असे आवाहन करण्यात येत आहे.महाराष्ट्रातील दोन प्रसिद्ध कवींच्या / समीक्षकांच्या मार्फत कवितासंग्रहाचे परीक्षण करण्यात येईल. ७ सप्टेंबर २०२ ५ रोजी या पुरस्कारांची घोषणा करण्यात येणार असून दि. ४ ऑक्टोबर २०२५ रोजी कवितेचे घर, शेगांव ( बु ), त. वरोरा, जि. चंद्रपूर येथे आयोजित कार्यक्रमात सुप्रसिद्ध साहित्यिकांच्या हस्ते हे तीनही पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्कारासाठी जास्तीत जास्त कवींनी आपले साहित्य पाठवावे असे आवाहन श्रीकांत पेटकर, कल्याण ९७६९२१३९१३ ( संस्थापक, कवितेचे घर ), किशोर पेटकर, नागपूर ८८०६२४७६८६ ( संकल्पनाकार, कवितेचे घर ), डॉ. प्रमोद नारायणे, वर्धा ९८५०३०९६६५ ( कार्यवाह, कवितेचे घर ) डॉ. संदीप भेले, बदलापूर ९८८१४२२४५३ ( कार्यक्रम समन्वयक, कवितेचे घर ), सूर्यकांत पाटील, वरोरा ९४२२१९१५२४ ( प्रसिद्धी प्रमुख, कवितेचे घर ) यांनी केले आहे.
