
नांदगाव -(. प्रतिनिधी ) मविप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव मध्ये नांदगाव पोलीस ठाण्याच्या वतीने न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र नांदगाव ,आदर्श प्राथमिक शाळा नांदगाव या तीनही संकुलांच्या शिक्षकांचा गुरुपौर्णिमा निमित्ताने सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती काळे यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. भदाणे साहेब होते. व्यासपीठावर न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती काळे , औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य श्री जाधव सर ,आदर्श प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री अविनाश सोळुंके सर परिवेक्षक श्री अविनाश शेवाळे सर उपस्थित होते.त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री भदाने साहेब यांचा हस्ते, तसेच त्यांच्या समावेश असलेले श्री मेहर दादा ,श्री सोनवणे दादा, श्री जायभावे दादा, श्री ब्रह्मावत दादा, यांच्या हस्ते या तीनही संकुलांच्या शिक्षकांचा गुरुपौर्णिमा निमित्ताने सन्मान करण्यात आला. अध्यक्षीय भाषणामध्ये श्री. भदाणे साहेब यांनी आपला यशाचा जीवन प्रवास कसा झाला हे सांगितले .तसेच त्यांनी आपल्या मनोगतून शिक्षकांप्रती आदरभाव व्यक्त केला. उच्च पदस्थ अधिकारी होण्याच्या मागे शिक्षकांची मार्गदर्शन महत्त्वाचे असते हे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक श्री शरद आहेर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री दत्तात्रेय भिलोरे यांनी केले.
