
साकोरे – रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, साकोरे (ता. नांदगाव, जि. नाशिक) येथे गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन आदरणीय श्री. रमेश काका बोरसे हे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री. झाल्टे डी. एस. सर यांनी गुरूंचे महत्व पटवून देणारे अत्यंत प्रेरणादायी विचार मांडले.

तसेच इयत्ता पाचवीतील 7 विद्यार्थी व आठवीतील 15 विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेतील गुणवत्ता यादीत आले.या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा, पालकांचा व मार्गदर्शक विषय शिक्षकांचा सत्कार माननीय अध्यक्ष रमेश काका बोरसे यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे नियोजन व संचालन इयत्ता नववी ‘ब’ च्या वर्गातील विद्यार्थ्यांनी अतिशय शिस्तबद्धपणे पार पाडले. या वर्गाच्या वर्गशिक्षिका आदरणीय श्रीमती बोरसे एम. एस. मॅडम यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले.या प्रसंगी सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांच्या सहकार्यामुळे हा गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत संस्मरणीय व यशस्वी ठरला
इ. 5 वी गुणवत्ताधारक विद्यार्थी..
*1. बोरसे अर्चित भाऊसाहेब
2. बोरसे आयुष उमेश
3. एंडाईत अक्षदा दिपक
4. मोरे श्रद्धा अरुण
5. बोरसे आराध्य तेजुल
6. कदम राजदीप प्रकाश
7. नवसारे जिगर बाबासाहेब*
इ. 8 वी गुणवत्ताधारक विद्यार्थी…
1. पगार पार्थ सचिन
(जिल्ह्यात प्रथम क्रमांक)
2. बोरसे अनुष्का उमेश* *(जिल्ह्यात तिसरा क्रमांक)
3. सुरसे प्रांजल शरद
4. आहेर मयूर राजेंद्र
5. ठुबे हर्षाली नितीन
6. आहेर पार्थ अरुण
7. आहेर अथर्व ज्ञानेश्वर
8. घुगे सैरंद्री सतिष
9. पैठणकर अक्षय संजय
10. केकान प्रणाली सचिन
11. बोरसे आयुष विजय
12. मोरे तनुजा गुलाब
13. मंडलिक वैष्णवी मधुकर
14. खैरनार तुषार हरिश्चंद्र
15. निकम आरती बाळू*
इ. 5 वी च्या गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना पुढील तीन वर्षासाठी प्रत्येक वर्षी 5000 रुपये व इ. 8 वी च्या विद्यार्थ्यांना पुढील दोन वर्ष 7500 रूपये एवढी शिष्यवृत्ती मिळेल.इयत्ता पाचवी मार्गदर्शक शिक्षक विभाग प्रमुख – सौ. खैरनार बी. आर.श्री. वळवी यु. एल.सौ. बोरसे एस. बी.श्री. वाघेरे जे. डी. इयत्ता आठवी मार्गदर्शक शिक्षक विभाग प्रमुख- श्री. चौरे जे. के.श्री. वळवी यु.एल.सौ. बागुल के. बी.श्री.लोखंडे ए. आर.श्री. माळी ए. यू.
