
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे न्यू मराठा हायस्कूलमध्ये जागतिक लोकसंख्या दिन साजरा करतांना उपस्थित मान्यवर, सर्व शिक्षक,विद्यार्थी आदी..
नाशिक (प्रतिनिधी )| मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे न्यू मराठा हायस्कूलमध्ये जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शिंदे हे होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पुजनाने करण्यात आली.इयत्ता दहावी ब च्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रम सादर करत विद्यार्थी मनोगत जान्हवी पवार,राज दाते, सृष्टी उन्हाळे कविता तनिष्का ढोमसे नाटीका तनुजा ,आदिती,अक्षरा,नेहा, अनुष्का,रसिका,दिया,पुनम,सानिका शिक्षक मनोगतात मोनिका कातड यांनी वाढती लोकसंख्या व त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या सांगितल्या.अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शिंदे यांनी झपाट्याने वाढणार्या लोकसंख्येमुळे अन्न, वस्त्र, निवारा, दारिद्र्य, बेकारी आणि रोगराई असे अनेक प्रश्न उद्भवू लागले आहेत. महत्त्वाचे म्हणजे देशाच्या प्रगतीला लोकसंख्या ही बाब अडसर ठरत आहे. ही लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शासनस्तरावर सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. आज जागतिक लोकसंख्या दिनाच्या दिवशी हेच संकल्प करणे उचित ठरेल. जगातील वाढत्या लोकसंख्येच्या समस्या विषयी लोकांच्या मनात जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी ११ जुलै ला ‘जागतिक लोकसंख्या दिन’ साजरा केला जातो. लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम सर्वत्र जाणवत आहेत. याविषयी जनजागृतीची गरज निर्माण झाली आहे. लोकसंख्या ही समस्या उग्र रुप धारण करीत असल्याने विकासकामांना खीळ बसत आहे. लोकांना मूलभूत गरजा देतानाही कसरत करावी लागत आहे.जगात भारत हा लोकसंख्येबाबात अव्वल क्रमांकावर आहे. चीनला देखील भारत मागे टाकण्याच्या दृष्टीने मार्गक्रमण करीत आहे. मात्र ही बाब खूप चिंताजनक आहे. ही लोकसंख्या वाढ आटोक्यात आणण्यासाठी सर्वाचा सहभाग आवश्यक आहे. हे सांगितले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी यांनी प्रयत्न केले.सुत्रसंचालन तनुजा गोसावी,आदिती चौधरी तर आभार अक्षरा दाभाडे हिने मानले.
