
लेखक:-जेष्ठ व्यापारी नारायण अग्रवाल कोपरगांव ्कोपरगाव
कर्मयोगी शंकररावजी कोल्हे साहेब व संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे यांच्या सामाजिक राजकीय बावनकशी मुशीत तावु्न सुखावुन निघालेल्या रणरागिणी सौ. स्नेहलता कोल्हे वहिनी साहेब यांनी गेल्या ३० वर्षात अहोरात्र गृहलक्ष्मीची जबाबदारी पार पाडतांना आपल्या परिसरातील सर्व महिलांच्या घरा घरात जाऊन प्लस्टिक पोत्यावर फतकल मारून मांडीला मांडी मनमोकळ्या गप्पा मारीत त्यांची संसारात होणारी फरफट जाणून घेतली. यावर वेगवेगळ्या प्रकारचे मार्गदर्शन करीत स्वतः च्या बळावर उभं राहण्यासाठी आधार दिला. आपली विश्वासार्हता सिध्द करण्यासाठी शहरी – ग्रामीण विभागीय महिला संघटन उभारले. यासंघटीत महिलांनी कंबरेला खोचलेल्या पुरचुंडीतील पै नि पैशाचे बळावर बचत गटाच्या माध्यमातून २० हजारांवर यशस्वी आर्थिक संस्कारी म्हणून सर्व क्षेत्रात स्वावलंबी उद्योजिका घडविल्या. या महिलांनी स्वबळावर पक्की घरे, मुला-मुलींचे उच्च शिक्षण, आरोग्य सुविधांनी त्यांच्या पायावर खंबीरपणे कायमस्वरूपी उभे करण्यासाठी सौ. स्नेहलता कोल्हे वहिनी साहेब यांनी सर्वस्व पणाला लावले. याचमुळे संपूर्ण देशात दरवर्षी लाखांवर विक्रमी ग्रामीण जनतेच्या आत्महत्या घडत असतांना कायमचा कोपरगांव तालुका कायमस्वरूपी अपवाद ठरला. याचबरोबर या तालुक्यात गेल्या पन्नास वर्षांत वैयक्तिक आरोग्य, नैसर्गिक एकही घटना नाही की, कर्मयोगी शंकरराव कोल्हे साहेब यांच्या यांच्या खांद्याला खांदा लावून कोल्हे कुटुंबियांच्या तीन पिढ्या सर्वस्व पणाला लावून धावून गेले नाही. हीच परंपरा सौ.स्नेहलता कोल्हे वहिनी साहेब याअहोरात्र प्रामाणिक पणे जोपासीत आहे. कोपरगांव तालुक्यातील रानोमाळ रात्री अपरात्री घोटभर पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या महिलांच्या डोके आणि कंबरेवरील हंडा कायमस्वरूपी हटविण्यात जे प्रामाणिक योगदान दिले त्याची बरोबरी कोणी करू शकतं नाही. कोपरगांव शहरातील पिण्याच्या पाण्याची टंचाई संपविण्यासाठी कर्मयोगी शंकरराव कोल्हे साहेब संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन दादा कोल्हे यांनी अथक संघर्ष करुन नगर पालिकेच्या पाचही पाणी पुरवठा तलावांची शासकिय आर्थिक मंजुरीसह अल्प किमतीत जागा मिळविण्यात कोल्हे पितापुत्र यशस्वी ठरले परंतु सत्ता बदलाने अडथळे निर्माण झाले. अशा परिस्थितीत सौ. स्नेहलता कोल्हे वहिनी साहेब यांनी सर्व सामान्य जनता दान शूर नागरिक ,वाविविध सामाजिक संघटना, उद्योग, संजीवनी उद्योग समूहाचे सहकार्य घेवून चौथ्या तळ्याच्या विस्तारीकरणाचे कामात तळपत्या उन्हात कंबरेला पदरखोचून भव्यदिव्य सामुदायिक श्रमदानाची धडक मोहीम सुरू केली परंतु येथे कामात अडथळे आल्यानेआजही चौथ्या तळ्याच्या विस्तारीकरणाचे घोंगडे भिजत पडलें त्याला कोणी वाली नाही ज्ञयाशिवाय पिण्याच्या पाण्याची टंचाई मुळापासून संपविण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या कडून निळवंडे धरणातून बंद पाईप लाईन सर्व आर्थिक तरतुदीसह मंजूर करून घेण्यात त्या कमालीच्या यशस्वी ठरल्या परंतु कोल्हे कुटुंबियांना आपण कधीच हटवू शकत नाही या आकसापोटी सर्वं विरोधक न्यायालयाच्या योजना पूर्ण करण्याच्या आदेशाला डावलून ही योजना गुंडाळण्यात काही काळ यशस्वी ठरले. असले तरीही राहाता- शिर्डी – कोपरगांव परीसरात अल्पावधीतच होणाऱ्या औद्योगिक, धार्मिक , कृषी क्षेत्रातील क्रांतीकरी वाटचालीत ही पाणी पुरवठा योजना राबविण्याशिवाय अन्य कोणत्याही स्वरूपात पर्याय उपलब्ध रहाणार नसल्याने सौ.स्नेहलता कोल्हे यांच्या दिर्घ दृष्टी प्रामाणिक यशस्वी कर्तबगारीची कोपरगांव सह ह्या परिसरातील विकास क्रांती इतिहासात सुवर्णक्षरात नोंद करण्याची वेळ निश्चित विरोधकावर आल्याशिवाय रहाणार नाही. अशा कर्तृत्ववान महिलैस कोपरगांवकरानी सलग ६५वर्षानंतर पहिल्या आमदार पदाचा मान दिला.तर भारतीय जनता पक्षाचे प्रदैश सचिव पदाची संधी दिली व आता भारतीय जनता पक्षाचे राज्य परिषेवर निवड करून राज्य विकास कार्याची बहुमोल स़ंधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सौ.स्नेहलता कोल्हे वहिनी साहेब आणि कोल्हे परिवाराचेत्रिवार अभिनंदन!!!तसेच भा्वी काळात या कुटुंबियांकडून इउत्तम देशसेवा घडविण्यासाठी परमेश्वराने सर्व प्रकारचे बल देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!! — जेष्ठ व्यापारी नारायण अग्रवाल कोपरगांव ्कोपरगाव
