
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९६३ वा दिवस* आपण लोकांमध्येच काम करीत असल्याने त्यांना आपले निरीक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांना वाटले तर विरोधी मत बनविण्याचे त्यांना स्वातंत्र्य आहे. आपण जनतेचे सेवक आहोत याचा आपल्याला क्षणभरही विसर पडू नये. त्यानेच आपली वागणूक योग्य राहण्यास मदत होईल. आपल्या कृतीमुळे संघटनेच्या प्रतिष्ठेला, हिताला आणि प्रतिमेला कधीही धक्का बसता कामा नये, याचे प्रत्येक कार्यकर्त्याने निक्षून पालन करावे. *स्वामी विवेकानंद…*
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●**
★ भारतीय सौर १९ आषाढ शके १९४७*
★ आषाढ वद्य /कृष्ण १
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शुक्रवार दि. ११ जुलै २०२५
★ १९८९ सुप्रसिध्द कादंबरीकार, चित्रपट कथालेखक नारायण हरी आपटे यांचा जन्मदिन.
★ १९९४ रणांगणातील असामान्य कामगिरीबद्दल “परमवीर चक्र” हा सर्वोच्च सन्मान मिळविणारे बॉम्बे सॅपर्स व महाराष्ट्रातील पहिले अधिकारी मेजर रामराव राघोबा राणे यांचा स्मृतिदिन.
★ जागतिक लोकसंख्या दिन…*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*
