
मुळडोंगरी (प्रतिनिधी). दिनांक 10 जुलै वार गुरुवार रोजी गुरुपौर्णिमा निमित्त गुरूंचा सन्मान सोहळा संपन्न झाला. श्री संत सेवालाल महाराज सेवाभावी संस्था संचालित सरस्वती माध्यमिक विद्यालय मूळडोंगरी येथे विद्यालयातील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आपले गुरु म्हणजे शिक्षक यांचा सन्मान केला व फुल पुष्पगुच्छ देऊन कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी *विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष एस. जी. राठोड साहेब व सचिव सिद्धांत दादा राठोड विद्यालयातील माननीय मुख्याध्यापक सौ बोरसे. एस. एस. मॅडम हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले* व विद्यालयातील सहशिक्षिका श्रीमती पवार मॅडम व बागुल मॅडम यांनी अध्यक्षस्थान स्वीकारून दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन केले. * याप्रसंगी विद्यालयातील सहशिक्षिका पवार मॅडम यांनी गुरु शिष्य ची महिमा विद्यार्थ्यांसमोर सुंदर अशा शब्दात प्रकट केली व काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी अमृता मोरे व रूपाली आव्हाड केले. याप्रसंगी विद्यालयाती
