
ओझर: दि.१० वार्ताहर येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या माधवराव बोरस्ते विद्यालयात महर्षी व्यास जयंती गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करण्यात आली. प्रास्ताविक मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी केले . प्रारंभी प्रमुख अतिथी प्रितेश भार्गवे सचिव सेवा ऑटोमोटिव्ह सुकेणे, सुमित सूर्यवंशी अमित साळी जीशान शेख श्रीकांत सोनवणे यांच्या हस्ते सर्व सेवकांना गुलाबपुष्प देण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात संगीत शिक्षिका शितल आहेर यांनी, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः या श्ल़ोकाने केली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शिक्षक व कर्मचारी बांधवांना गुलाबपुष्प देऊन वंदन केले. अध्यक्षीय भाषणात प्रितीश भार्गवे यांनी गुरुनिष्ठा कर्तव्ये श्रद्धा भक्ती विश्वास वात्सल्य तसेच आपणास गुरूमुळे ज्ञान व मार्गदर्शन मिळते असे सांगितले. यावेळी विद्यार्थी व शिक्षिका मंगल सावंत सरोज खालकर सीमा पाटील यांनी गुरुौर्णिमेची महती विद्यार्थ्यांना सांगितली. महर्षी व्यासाप्रती आदरभाव व्यक्त करताना मुख्याध्यापक सोपान वाटपाडे म्हणाले, गुरु म्हणजे केवळ शिकवणारे नव्हे तर जीवनात दिशा दाखवणारे प्रकाशस्तंभ आहेत.

परमात्मा ज्याने ही सृष्टी बनविली, आई वडीलांनी जन्म दिला, गुरुवर्यांना ज्यांनी विद्या दिली, ज्यांच्यामुळे ह्या जगण्याला अर्थ मिळाला, गुरु म्हणजे दिशा आणि प्रेरणा असून अशा सर्वांनाच वंदन करण्याचा आजचा दिवस असल्याचे विचार त्यांनी व्यक्त केले. यानिमित्त प्रीतीश भार्गवे यांनी मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांचा आदर्श गुरु म्हणून सत्कार केला. फलक रेखाटन मोनाली निकम वर्षा पाटील यांनी केले. व्यासपीठावर पर्यवेक्षक दशरथ शिंदे राजेंद्र शिंदे आत्माराम शिंदे भाऊसाहेब रौंदळ दादासाहेब सोनवणे बाबासाहेब लभडे नरेंद्र डेरले बाबासाहेब गायकवाड रेखा देशमाने संगीता शेटे आदी सर्व वरिष्ठ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षिका शितल हांडोरे यांनी केले आभार हेमंत भट यांनी मानले.
