
कसबे सुकेणे प्रतिनिधी ता 10 – मौजे सुकेणे ता निफाड येथील कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावी तुकडी अ च्या विद्यार्थ्यांकडून विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला अध्यक्षस्थानी प्राचार्य रायभान दवंगे होते सुरुवातीला प्राचार्य दवंगे, उपमुख्याध्यापक अनिल परदेशी, पर्यवेक्षक राजेश खताळ यांच्या हस्ते महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रास्ताविक भारत मोगल यांनी केले यावेळी विद्यार्थिनी कु वैष्णवी भंडारे व कु कार्तिकी सोनवणे यांनी गुरु पौर्णिमेचे महत्त्व विशद केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य दवंगे यांनी गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते त्यामागचे ध्येय व उद्दिष्टे स्पष्ट करत सर्व सेवकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या सूत्रसंचालन कु समीक्षा भंडारे व कु श्रेया मोगल यांनी केले तर आभार कु आदिती काठे हिने मानले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते
