
मखमलाबाद विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त पालखीचे पूजन करतांना मविप्र सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे,संचालक रमेश आबा पिंगळे व सर्व मान्यवर.याप्रसंगी प्राचार्य संजय डेर्ले,पर्यवेक्षक सुनील पाटील,शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

मखमलाबाद { वार्ताहर } = मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे आषाढी एकादशी निमित्त पालखी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे,संचालक रमेश आबा पिंगळे उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर उच्च माध्यमिक स्कूल कमिटी अध्यक्ष पंडितराव पिंगळे,ग्रंथमित्र रामचंद्र अर्जुन काकड सर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष रामदास पिंगळे,माजी नगरसेवक पुंडलिकराव खोडे,स्कूल कमिटी सदस्य ज्येष्ठ सभासद विश्वनाथ पिंगळे,दिलीपराव पिंगळे,मधुकर पिंगळे,नारायण वाघ,वसंतराव पिंगळे,बाळासाहेब पिंगळे,चित्रा तांदळे,राजेंद्र ढबले,प्रभाकर फडोळ,भास्कर तांबे,प्राचार्य संजय डेर्ले,अभिनवचे मुख्याध्यापक प्रमोद ठाकरे, पर्यवेक्षक सुनील पाटील आदी उपस्थित होते.मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमापूजन व सरस्वती पूजन करण्यात आले.सांस्कृतिक कमिटी प्रमुख ज्येष्ठ शिक्षिका दिपाली कोल्हे यांनी प्रास्ताविक केले.प्रस्ताविकात त्यांनी आषाढी एकादशीचे महत्त्व सर्व विद्यार्थ्यांना सांगितले,तसेच कार्यक्रमाची रूपरेषा सादर केली. प्राचार्य संजय डेर्ले यांच्या शुभहस्ते सर्व प्रमुख पाहुण्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे यांनी आषाढी एकादशीचे महाराष्ट्रातील धार्मिक महत्त्व,वारकऱ्यांची दिंडीची परंपरा याचे महत्त्व सांगितले.सर्व विद्यार्थ्यांना व शालेय परिवाराला त्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.त्यानंतर संगीत शिक्षक तुकाराम तांबे व त्यांच्या गीतमंचाने विठ्ठल रुक्मिणीची आरती करून मान्यवरांच्या शुभहस्ते ज्ञानेश्वरी ग्रंथ व विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचे,पालखीचे पूजन करण्यात आले.मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे व संचालक रमेश आबा पिंगळे यांनी पालखी घेऊन दिंडी सोहळ्यास प्रारंभ केला.इयत्ता ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा सादर केली होती.यामध्ये विठ्ठल रुक्मिणीची, विविध संतांची वेशभूषा तसेच मुलींनी नऊवारी साडी,डोक्यावर तुळस व मुलांनी वारकरी पोशाख,हातात टाळ,मृदंग,वीणा घेऊन दिंडीत सहभागी झाले होते.मखमलाबाद गावातून दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळेस अनेक महिलांनी पालखीचे पूजन केले.गावातील बस स्टॅन्ड,मुख्य चौकामध्ये व शालेय क्रीडांगणावर विद्यार्थ्यांचा अतिशय सुंदर असा रिंगण सोहळा पार पडला.यामध्ये गोल रिंगण,उभे रिंगण,फुगडी यांचा विद्यार्थी व शिक्षकांनी भरपूर आनंद घेतला.संतांच्या घोषणांनी, अभंगांनी,टाळमृदुंगांनी, रांगोळ्यांनी परिसर भक्तीमय होऊन आनंदाने न्हाऊन गेला होता.या दिंडीतील रिंगण सोहळ्यासाठी इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना ज्येष्ठ शिक्षिका योगिता कासार तसेच इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना ज्येष्ठ शिक्षिका वर्षा पाटील,अश्विनी वडघुले,संगीत शिक्षक तुकाराम तांबे यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षिका दिपाली कोल्हे व अनिल पगार यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य संजय डेर्ले,पर्यवेक्षक सुनील पाटील, सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
