
**सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९५८ वा दिवस*
कोणतेही कार्य तीन अवस्थांमधून पुढे जात असते उपहास, विरोध आणि अंतिमतः स्विकार. काळाच्या पुढे पाहणाऱ्या द्रष्ट्यांचा नेहमी उपहास होतो. म्हणून विरोध, छळ या सर्वांचे नेहमीच स्वागत केले पाहिजे. मात्र आपले मन सतत स्थिर असले पाहिजे, चरित्र शुध्द असले पाहिजे. नैतिकतेचे अधिष्ठान असले पाहिजे. आपल्या मनात परमेश्वराच्या ठायी नितांत श्रद्धा व भक्ती पाहिजे. विरोधाच्या वावटळी या श्रद्धेने पाहता-पाहता विरून जातील आणि अंतिमतः आपलाच विजय होईल अशी दुर्दम्य इच्छाशक्ती आपल्या ठायी असली पाहिजे. *स्वामी विवेकानंद…*
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●**
★ भारतीय सौर १५ आषाढ शके १९४७*
★ आषाढ शुध्द /शुक्ल ११
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ रविवार दि. ६ जुलै २०२५
★ देवशयनी आषाढी एकादशी 🚩🚩🚩
★ चातुर्मास प्रारंभ..
.★ ताजिया मोहरम
★ १८३७ थोर प्राच्यविद्या संशोधक, संस्कृत पंडित भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचा जन्मदिन
★ १९०१ जनसंघाचे संस्थापक, माजी केंद्रीय मंत्री डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जन्मदिन.
★ १९०५ समाजसेविका, राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका लक्ष्मीबाई केळकर यांचा जन्मदिन
★ युवा उद्योजक दिन.
★ आषाढी एकादशीच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा… *जय हरि माऊली II*
