
मनमाड( वार्ताहर) मराठा विद्या प्रसारक समाज संचलित अभिनव बाल विकास मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्ताने पालखी सोहळ्याचे व दिंडीचे आयोजन करण्यात आले होते . यानिमित्ताने पालखीचे पूजन म.वि.प्र मनमाड विद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा श्री बाळासाहेब साळुंखे साहेब व कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य श्री गव्हाणे सर यांच्या हस्ते करण्यात आले.

विद्यालयातील चिमुकल्या वारकऱ्यांची पायी दिंडी काढण्यात आली .या दिंडी सोहळ्याचे आकर्षण म्हणजे चिमुकल्यानी केलेली विठ्ठल रखुमाई ची वेशभूषा ,वारकरी ,टाळकरी व विठू नामाचा गजर .तसेच या दिंडी सोहळ्यात रिंगण सोहळा देखील घेण्यात आला.यात सर्व विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी ,पालक उपस्थित होते .कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक समिती ने केले.प्रसंगी विद्यालयातील कलाशिक्षक श्री. एस डी कदम यांनी साकारलेले रेखाचित्र हेही आजच्या सोहळ्याचे आकर्षण ठरले .
