
नांदगाव (प्रतिनिधी )-मविप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात दिंडी व रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुणाल भाऊ खरोटे होते. व्यासपीठावर विजय काकळीज सर ,गावंदे काका ,अशोक भाऊ शिंदे, राजेश आबा पाटील ,संजू भाऊ निकम, बरोडे साहेब, संदीप भाऊ जेजुरकर, बाबासाहेब कदम ,श्रीमती मनीषा ताई काकळीज ,श्रीमती अक्षदा ताई कुलकर्णी ,मुख्याध्यापिका सौ ज्योती काळे , पर्यवेक्षक श्री अविनाश शेवाळे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विठुरायाच्या प्रतिमा पूजन व अश्वपूजनाने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विठुरायाची आरती देखील घेण्यात आली. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे दिंडी व रिंगण सोहळा यात विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ,ज्ञानोबा माऊली तुकाराम चा जय घोषणा भव्य दिंडी व रिंगण सोहळा मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा करण्यात आला .याप्रसंगी विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा सादर करत टाळ व मृदुंगाचा तालावर पावली घेतली. अश्व रिंगण देखील घेण्यात आले. भागवत धर्माचा ध्वज पताका फडकवण्यात आली.नंदू महाराज यांच्या वारकरी आश्रमातील विद्यार्थ्यांनी देखील अभंग गायन केले. विद्यालयातील बाल कीर्तनकार शाहू पवार यांनी याप्रसंगी अभंग रुपी कीर्तन सादर केले .संपूर्ण विद्यालयात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. विद्यालयातील सर्व विद्यार्थीनी, उपस्थित मान्यवर, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पालखी रिंगण सोहळ्यात फुगडी चा आनंद घेतला. या कार्यक्रमासाठी मविप्र संस्थेचे तालुका संचालक मा.श्री. अमित भाऊ बोरसे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
