
मूळडोंगरी (प्रतिनिधी) “ठेवून शेतीचे भान जीवाचे करतो रान पिकवतो तू म्हणून वाढवले जात पान बळीराजा तूच खरी महाराष्ट्राची शान”…दिनांक १- जुलै-2025 वार मंगळवार रोजी महाराष्ट्र कृषी दिन व हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव फुलसिंग नाईक यांची 112 वी जयंती विद्यालयात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष एस. जी. राठोड साहेब व संस्थेचे सचिव सिद्धांत दादा राठोड व माननीय मुख्याध्यापिका सौ एस. एस. बोरसे मॅडम यांनी प्रमुख पाहुणे स्थान स्वीकारले. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला हार व पुष्पगुच्छ अर्पण केला.या वेळी विद्यालयातील सहशिक्षक श्री जाधव एम. ई. यांनी वसंतराव नाईक यांच्या जीवनावर आपले पुष्पगुंपले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शितल माळी मॅडम यांनी केले व छोटेसे गीत सादर केले विद्यालयातील इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणात ना त्यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले.यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
