
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९५२ वा दिवस भारतात अन्नदान, विद्यादान व प्राणदान (जीवनदान) ही विशेष प्रशंसली जातात. या सर्वांमध्ये विद्यादानाला अग्रस्थान आहे. एखाद्याने दुसऱ्याचे प्राण वाचविले तर ती चांगली गोष्ट आहे. पण एकाने दुसऱ्याला ज्ञान दिले, त्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या सूर्य प्रकाशाची वाट दाखवली तर, ती त्याहून अधिक चांगली गोष्ट आहे. ज्ञानाहोऊन अधिक मोठी अशी जगात दुसरी कोणतीही शक्ती नाही. सर्वसामान्य, दुःखी, पिडीत जनतेला तुम्ही ज्ञानी, शिक्षित केले पाहिजे. ज्ञानदान निरपेक्ष भावनेने करणे आवश्यक आहे. ज्ञानाचा विक्रय करणे निंदास्पद ठरते.
*स्वामी विवेकानंद…*
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर ९ आषाढ शके १९४७*
★ आषाढ शुध्द /शुक्ल ५
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ सोमवार दि. ३० जून २०२५
★ १९०५ सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांनी “सापेक्षतावादाचा” सिध्दांत प्रसिद्ध केला.
★ १९१७ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक सदस्य, राजकीय सामाजिक नेते, स्वातंत्र्यसेनानी, ब्रिटिश संसदे पहिले भारतीय सदस्य पितामह दादाभाई नौरोजी यांचा स्मृतीदिन
.★ आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन.*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*
