
नाशिक (प्रतिनिधी):नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यनिष्ठ व जनसंपर्क साधणाऱ्या आमदार सौ.सीमाताई महेश हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्र.९ मधील रामेश्वर महादेव मंदिर परिसर,गंगासागर नगर, श्रमिकनगर येथे वृक्षारोपण उपक्रमाचा भव्य आयोजन करण्यात आला.आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने “निसर्गसंवर्धन हीच खरी जबाबदारी” हा संदेश देत आमदार सौ.सीमाताई हिरे यांनी पारंपरिक जल्लोष टाळून पर्यावरण पूरक उपक्रम राबवण्याचे आवाहन केले होते.त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत विविध औषधी व पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली.या उपक्रमात त्यांनी स्वतःही सहभाग घेत निसर्गाशी आपले नाते दृढ करण्याचे आवाहन केले.

यावेळी त्या म्हणाल्या,वाढदिवस साजरा करण्याची ही एक सकारात्मक आणि काळाची गरज ओळखणारी पद्धत आहे.प्रत्येक नागरिकाने माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या परिसरात एक तरी वृक्ष लावावा,हे वृक्ष संवर्धन करून भविष्यात होणाऱ्या दुष्परिणाम आपण टाळू शकतो हा संकल्पच खऱ्या अर्थाने माझ्यासाठी खरी भेट ठरेल.”कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमदार सौ.हिरे यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.त्यानंतर उपस्थितांनी केक कापून त्यांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमास छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा.करण भाऊ गायकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी सौ.रश्मी हिरे,सौ.मंगला खोटरे,सौ.मनीषा गांगुर्डे,श्री.दिनकर कांडेकर,श्री.इंद्रभान सांगळे,श्री.नवनाथ शिंदे,श्री.विलास गायकवाड,श्री.बजरंग शिंदे,श्री.संजय तूपलोंढे,श्री.शरद शिंदे,श्री.गुलाब माळी,श्री.वैभव दळवी,श्री.अविनाश गायकर,श्री.प्रितेश पाटील आदी मान्यवर व प्रभागातील महिला व नागरिक संख्येने उपस्थित होते.या उपक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका सौ.हेमलता कांडेकर,सामाजिक कार्यकर्त्या सौ.सविता करण गायकर,सौ.अर्चना तूपलोंढे,प्रेम दशरथ पाटील आणि सागर जारे यांनी संयुक्तरीत्या केले होते.
