
बुलढाणा : (बबनराव वि.आराख) सुमती रमेश वानखेडे सार्वजनिक वाचनालय सावळा ता जि बुलढाणाच्या वतीने शाहीर ईश्वर मगर यांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय विभागाचा प्रतिष्ठेचा डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल वाचनालयाचे अध्यक्ष प्रा रमेशजी वानखेडे ह्यांचे शुभहस्ते त्यांचा सह्रुदय सत्कार करण्यात आला सामाजिक कार्यकर्ते समाज भूषण श्री गणेशजी वानखेडे यश वानखेडे आणि अन्य कार्यकर्ते यांचे उपस्थितीत सत्कार केला जिद्द आणि चिकाटी आणि प्रयत्नाची पराकाष्ठा असेल तर, ‘असाध्य ते साध्य करिता सायास’ह्या उक्तीनुसार जो जगेल त्याला यश आणि किर्तीही सहज मिळेल असे वक्तव्य शाहीरानी उत्तरादाखल दिले वर्ग ६ मधे असल्यापासून स्टेज मिळाले आज ६५ वर्षे घेतलेल्या परिवर्तन वादी प्रबोधनाचा वसा व त्याच फळ ह्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाचा डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार आहे असं मला वाटतं आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सा़गता करण्यात आली.
