
नांदगांव : (मारुती जगधने)नांदगाव वनपरिक्षेत्र विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी कोकाटे यांची नव्यानेच नांदगाव येथे नियुक्ती झाली असून त्यांनी पहिल्याच झटक्यामध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर ती कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे तालुक्यात ग त महिनाभरापासून पाऊस चालू आहे त्यामुळे नदी नाल्यांना काही भागातून पाणी साचलेला आहे काही भागात पाणी झुळझुळ वाहत आहे त्यातच पहिल्याच पावसामध्ये जेमतेम आलेल्या रेतीची चोरी करून अवैद्य वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचालकांवरती कारवाई केल्याने अवैद्य रेती गौण खनिज वाहणाऱ्यांचे धाबे दनाणले आहेत.तालुक्यातील मूळ डोंगरी भागामध्ये मन्याड नदी पात्रातून अवैधवाळू चोरी च्या नियमित तक्रारी होत असायच्या परंतु गेल्या तीन चार महिन्यांमध्ये सध्या या संदर्भातल्या वाळू अवैध्य प्रकरणाच्या कोणत्याही तक्रारी उपलब्ध नव्हत्या परंतु पावसाळा सुरू होताच अवैद्य खनिजाची चोरी होण्याचं काम सुरू झाले आहे.आता इथून पुढे वनपरिक्षेत्र विभाग आणि त्याशी संबंधित असणाऱ्यांना जागरूकता बाळगावी लागणार आहे.नांदगाव वन विभागाने केलेल्या कामगिरी मध्ये तालुक्यातील रणखेडा बिरोळे हद्दीमध्ये अवैद्य वाळू उपसा करणाऱ्या चार ट्रॅक्टर धारकांना कारवाई करण्यात आली असून सदरचे चार वाहने वन विभागाने ताब्यात घेतले आहे या संदर्भात नांदगाव वन विभागाकडून अवैद्य वाळू प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी ट्रॅक्टर मालक यांचा शोध घेऊन त्यांच्यावर प्रतिबंध कायदेशीर कारवाई करण्यासाठी तपास सुरू झाला आहे सदर मुद्देमाल ट्रॅक्टर ट्रॉली चार सहित नांदगाव येथे सदर वाहने जप्त करण्यात आली आहे संशयित आरोपी यांच्या विरोधात भारतीय अधिनियम वन अधिनियम1927 चे कलम 26 आय ड जी 41, 52 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रॅक्टर मालक यांचा शोध घेणे चालू आहे सदरील तपास सहाय्यक वनरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव परिक्षेत्र अधिकारी एच बी कोकाटे वनपरिक्षेत्राधिकारी नांदगाव न्यायडोंगरी मंडल विभागाचे एम एम राठोड हे करीत आहे नांदगाव वनपरिक्षेत्र तील विष्णू राठोड ,नवनाथ बिन्नर ,अमोल पाटील ,संजय बेडवाल ,अमोल पवार ,रवींद्र शिंदे, समाधान सोनवणे ,विशाल , मनीषा पाटील अण्णा टेकनर ,विजय , संतोष दराडे आदी कर्मचाऱ्यांनी या मोहीने मध्ये सक्रिय सहभाग नोंदवून अवैद्य वाळू चोरून गौण खनिजाची चोरी करणाऱ्या चार ट्रॅक्टर यांना ताब्यात घेतले आहे.
