
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९५० वा दिवस एकदा एखादी कल्पना स्वीकारली की मग तिला आपले जीवनसर्वस्व बनवा; सतत तिचा ध्यास घ्या, तिचीच स्वप्ने बघा, तिच्यावर जगा. तुमचे मस्तिष्क, तुमचा मेंदू, तुमचे स्नायू, तुमचे मज्जातंतू, तुमच्या शरीराचा प्रत्येक भाग, शरीराचा अणुरेणू त्याच कल्पनेने भरला जाऊ द्या. इतर कोणत्याही विचाराला वा कल्पनेला थारा देऊ नका. यशस्वी होण्याचा हाच मार्ग आहे. जगातील महान धर्मवीर केवळ ह्याच तन्हेने निर्माण होत असतात.
स्वामी विवेकानंद…
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर ७ आषाढ शके १९४७*
★ आषाढ शुध्द /शुक्ल ३
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शनिवार दि. २८ जून २०२५ ★ १९२१ भारताचे नववे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांचा जन्मदिन.
✍️ विवेकानंदांचे जाज्वल्य, प्रेरणादायी व अनुकरणीय असे मनुष्य निर्माणाचे व राष्ट्राच्या पुनरुत्थानाचे विचार नियमित व अखंडितपणे गत *आठ वर्षांपासून (३१ मे २०१७)* पासून आपल्या पर्यंत पोहचविण्याचा संकल्प आज माझ्या ‘जन्मदिनी’ पूर्णत्वास जात आहे. या सातत्यपूर्ण उपक्रमाचा आज २९५० वा दिवस असून, हे वैचारिक अग्नीहोत्र असेच सतत तेवत रहावे यासाठी ठाकूरांच्या, स्वामीजींच्या चरणी प्रार्थना व आपल्या सर्वांच्या शुभाशिर्वादाची अपेक्षा.
*प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे 9921976422*
प्रा.अमोल अहिरे सरजी आपण आठ वर्षा पासुन विवेक विचार हे सदर उत्तम रितीने चालवत आहात. मनुष्य जीवनाला प्रेरणा देणारे स्वामी विवेकानंद यांचे विचार देवुन माणुसपण जोपासली जाण्यासाठी तुमची धडपड अभिनंदनीय आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून गणतंत्र न्युज तर्फे हार्दिक शुभेच्छा!!!
