
नाशिकरोड:- (प्रतिनिधी ) येथील शिखरेवाडीतील स्वानंद ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या सभागृहात तंबोला गेमचे आयोजन करण्यात आले होते. दिलीप भिंगारकर यांनी शैलीदार पद्धतीने तंबोला गेमचे संचलन केले. त्यांना सचिव अविनाश गोसावी, उपखजिनदार शरद वैद्य, प्रदीप भालेराव यांनी सहाय्य केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपसचिव श्रीकांत मोहरील, सदानंद पालकर, सुधाकर सोनवणे, आधारस्तंभ वसंत उपासनी, विजय गीत, सिंधू उपासनी, उषा गीत, दीपाली भिंगारकर, वैजयंती चंद्रात्रे, कल्पना वैद्य, शालिनी डहाळे, मृणाल प्रभुणे यांनी विशेष परिश्रम घेतले. अनिल सहस्रबुद्धे यांनी परिचय,रवींद्र चंद्रात्रे यांनी सभासदांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार केला. गेममधील विजेत्या सभासदांना बक्षिसे देण्यात आली.फोटोओळी:-स्वानंद ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या तंबोला गेमप्रसंगी दिलीप भिंगारकर आणि सहभागी सभासद.
