
सिन्नर ( प्रतिनिधी)
राजर्षी छत्रपती शाहू महाराज सामाजिक न्याय व आरक्षणाचे जनक असून त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी व दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बही:षाल शिक्षण मंडळाचे व्याख्याते डॉ .श्यामसुंदर झळके यांनी केले.क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर येथे आयोजित कार्यक्रमात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त नामदेव काकड होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संचालक समाधान गायकवाड व ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्यामसुंदर झळके उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ.झळके यांनी सामाजिक न्याय,समता, स्वातंत्र्य,बंधुभाव तसेच शिक्षणाला महत्व देऊन समाजातील अनिष्ट ,प्रथा,परंपरा, जातीभेद,नाहीसा करण्यासाठी व वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी शाहू महाराजांनी आपले जीवन समर्पित केले.त्यांनी विद्यार्थ्यांसाठी शाळा,महाविद्यालये सुरू करून अनेक वसतीगृहे उभारली. सर्वांना समान वागणूक दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. किशोर पखाले यांनी केले. इतिहास विभाग प्रमुख प्रा. अमोल आव्हाड यांनी आपल्या मनोगतातून छत्रपती शाहू महाराज यांचा जीवनपट मांडला. संस्थेचे संचालक समाधान गायकवाड यांनी आपल्या मनोगतात, छत्रपती शाहू महाराजांनी १९१७ साली डोंगरे वसतिगृह याठिकाणी वंजारी बोर्डिंगचे भूमिपूजन केले.त्याचेच पुढे के.व्ही.एन.नाईक शिक्षण संस्थेत रूपांतर झाले व त्याचा आज वटवृक्ष झाल्याचे सांगून त्यांच्या समतावादी विचारांवर ही संस्था कार्य करीत असल्याचे सांगितले. यावेळी संचालक नामदेव काकड यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. मंगल सांगळे यांनी केले. तर आभार प्रा. ज्ञानेश्वर चकोर यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. ज्योती गायकवाड, सांस्कृतिक अधिकारी प्रा. पूनम कुटे, करियर कट्टा समन्वयक प्रा. सिद्धीका सानप, परीक्षा विभाग प्रमुख प्रा. संतोष आव्हाड, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
