
पिंपळगाव बसवंत ( वार्ताहर). मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कर्मवीर गणपत दादा मोरे जनता विद्यालय पिंपळगाव बसवंत येथे सामाजिक न्यायाचे प्रणेते, समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज यांना जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.एस एन डेर्ले सर होते . प्रथमतः मा.मुख्याध्यापकांच्या हस्ते प्रतिमापूजन संपन्न झाले.त्यानंतर विद्यालयातील प्रणव मोरे वसंचिती विधाते या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून राजर्षि शाहू महाराजांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस.एन डेर्ले सर यांनी आपल्या मनोगतातून राजश्री शाहू महाराज यांनी विदयार्थ्यांना शिक्षणाचा हक्क, आरक्षण, चुकीच्या प्रथा परंपरा चालीरिती यावर्ती प्रहार करून समाज उन्नतीचे काम केले तशेच शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जगदीश कुशारे आभार श्री.सोमनाथ कारे यांनी केले . कार्यक्रमासाठी विद्यालयाचे कलाशिक्षक श्री.अनिल शिरसाठ यांनी सुंदर फलक लेखन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले .
