
सिन्नर (प्रतिनिधी)२६ जून २०२५ आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी १५१व्या जयंती निमीत्त महामित्र परिवार व आद्य क्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथे त्यांना अभिवादन करण्यात आले.*राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.या कार्यक्रमाचे *अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे* म्हणाले की ,छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा चालवणारे राजे म्हणजे राजश्री शाहू महाराज ते कोल्हापूर संस्थानचे राजे होते.शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली.असे म्हणाले *जगन्नाथ कटारनवरे म्हणाले की* जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली.असे म्हणाले

*डाॅ.विजय लोहारकर म्हणाले की* त्यांनी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी वेगवेगळ्या संस्था निर्माण केल्या.त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी व मूकनायक वृत्तपत्रासाठी सहकार्य केले होते. तसेच, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे राजर्षी शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अमलात आणली. मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणावयाचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे.असे म्हणाले. काॅम्रेड *हरिभाऊ तांबे म्हणाले की* व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली व तिची त्वरित अंमलबजावणी करुन संबंधत अधिकाऱ्याकडून अहवाल मागविले. शाहूंच्या या निर्णयाला तेंव्हा अनेक उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी विरोध केला. त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या लोकांसाठी नोकरीमध्ये राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या. असे म्हणाले *विजय मुठे म्हणाले की*वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रेरित झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले. अशा महान राजास विनम्र अभिवादन !ओबीसींचे मसीहा, सामाजिक न्यायाचे शिल्पकार आणि *भारताचे माजी पंतप्रधान स्व. विश्वनाथ प्रताप सिंह* तथा व्ही. पी. सिंह त्या काळात होत असलेला प्रचंड विरोध पत्करून आणि स्वतःची राजकीय कारकीर्द पणाला लावून देशातील सामाजिक समतेचा नवा अध्याय लिहिणारे स्व. व्ही. पी. सिंह यांचं हे कार्य वंचित, बहुजन, अठरापगड समाजासाठी अतिशय मोलाचे असे योगदान आहे.तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘भारतरत्न’ देण्याचा निर्णय घेऊन भारताच्या इतिहासात गौरवशाली पान जोडण्याचे महत्त्वाचे काम देखील त्यांनी केले.त्यांच्या या कार्याबद्दल या देशातील समस्त बहुजन समाज कृतज्ञ आहे. त्यांना जयंतीनिमित्त कृतज्ञ अभिवादन!या कार्यक्रमाचे *सुत्रसंचलन प्रकाश माळी प्रास्ताविक*विजय मुठे तर आभार श्रीकांत जाधव* यांनी मानले. या प्रसंगी महामित्र दत्ता वायचळे,डाॅ.विजय लोहारकर,काॅम्रेड हरिभाऊ तांबे, सहसंस्थापक विजय मुठे,जगन्नाथ कटारनवरे माजी नगरसेवक श्रीकांत जाधव,शिवाजी कानडी धम्मानंद डोंगर दिवे,गणपत काळे,प्रकाश माळी राजेंद्र देशमुख,भगवान पाचोरे,मनोज माळी आदि उपस्थित होते.
