
नाशिक (प्रतिनिधी ) दिव्यांग विद्यार्थ्यांनी स्वावलंबनासह व्यावहारिक ज्ञान प्राप्त करावे.- इरिन नाशिकचे मुख्य प्रशिक्षक मा.श्री. प्रफुल्ल. पि.सोलेजिद्द,चिकाटी, मेहनत या त्रिसूत्रीचा अवलंब करून दिव्यांग विद्यार्थ्यांनी यशाची शिखरे पादक्रांत करण्याचे प्रतिपादन इरिन नाशिकचे मुख्य प्रशिक्षक मा.श्री. प्रफुल्ल. पी. सोले यांनी केले. ते ज्ञानसाधना बहूउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने आयोजित दिव्यांग विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. राजाराम गायकवाड होते. राणी लक्ष्मीबाई भवन, गोळे कॉलनी नाशिक – 02 येथील संपन्न झालेल्या कार्यक्रमात स्वातंत्र्य लक्ष्मी राणी लक्ष्मीबाई स्मारक समिती च्या सरचिटणीस ॲड. मा. सौ. शोभा गोसावी, स्वानंदी शिक्षण संस्था हरसुल च्या सचिव मा. सौ. छाया कुलकर्णी, संस्थेचे सल्लागार मा.श्री. अजित कुलकर्णी, सेवानिवृत्त शिक्षिका. मा. सौ. कल्पना भामरे, संस्थेचे सचिव मा.श्री. प्रदीप जगताप, खजिनदार, मा.श्रीमती. संगीता जाधव, समाधान मोरे, राष्ट्रीय दृष्टीहीन संघाचे सचिव, मा. श्री.जगदीप कवाळ, संस्थेचे सर्व पदाधिकारी, हितचिंतक, प्रतिष्ठित नागरिक, पालक बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 10 वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12 वी परीक्षेत यश संपादन केलेल्या नाशिक जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना पांढरी काठी, व शैक्षणिक साहित्य देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. अंध विद्यार्थिनींनी स्वागत गीत म्हटले, प्रास्ताविक, संस्थेचा व पाहुण्यांचा परिचय मा.श्री. राजाराम गायकवाड यांनी करून दिला. यशराज शिंदे व यश औटे या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या सामाजिक दातृत्वाची प्रशंशा केली. मान्यवरांची भाषणे झालीत. सूत्रसंचालन प्राध्यापिका मा. सौ. वसुधा जोशी यांनी केले. तर आभार प्रदीप जगताप यांनी मानलेत. कार्यक्रमाचा समारोप झाला. तदनंतर उपस्थितांनी अल्पोपहाराचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मा. श्री. संजय परदेशी, संदिप पवार, ओमकार डावरे, अर्चना बोकेफोडे, यश औटे यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थी सत्कार यादी खालील प्रमाणे.इयत्ता 10 वी1) यशराज शिंदे, 92.20% प्रथम क्रमांक2) गांगुर्डे सोहम पोपट, 78.40% द्वितीय क्रमांक3) करपट वृषाली शांताराम, 77.20% तृतीय क्रमांक12 वी1) औटे यश दौलत, 83.50% प्रथम क्रमांक 2) पवार शांतनु सचिन, 74.67% द्वितीय क्रमांक 3) गवांदे नंदिनी गोविंद, 67.17% तृतीय क्रमांक. भोये सविता, गांगुर्डे जया, ढेंगळे शार्दुल, पवार शांतनु, सुनिधी चव्हाण, नरोडे तेजस, बोरसे मोनिका, सहाणे हेमाली आदी विध्यार्थी सत्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित होते.
