
दातृत्वाचा ज्ञानयज्ञ उपक्रमात नासाका विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य प्रदान करताना माजी मुख्याध्यापक बी.के.नाठे, मुख्याध्यापक अरुण पगार आणि सर्व शिक्षक कर्मचारीवर्ग.
नाशिकरोड:- (प्रतिनिधी )पळसे येथील नाशिक सहकारी साखर कारखाना माध्यमिक विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या ‘दातृत्वाचा ज्ञानयज्ञ’ या उपक्रमात अनेक दानशुरांनी शैक्षणिक साहित्यासह आवश्यक मदत करत दातृत्वाचा वसा जपला. समाजशील व्यक्तिमत्त्व अपूर्वा वैद्य, ज्येष्ठ मुद्रितशोधक प्रकाश वैद्य, नाशिकरोडच्या शिखरेवाडीतील स्वानंद ज्येष्ठ नागरिक संस्थेचे सचिव अविनाश आणि सुनंदा गोसावी, माजी विद्यार्थी वनिता चकणे (सानप), ॲड.जयवंत गायधनी, प्रवीण चंद्रभान गायधनी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक अनंत वाणी आणि रजनी वाणी, पळसे येथील ग्रामाभिमान मंचेचे सचिव सुनील आगळे (पिताश्री सोमनाथ आगळे यांचे स्मरणार्थ), क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ प्रा.तुकाराम भवर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष गायधनी, विद्यालयातील शिक्षिका एस.एल.वाणी आदि मान्यवरांनी आर्थिक मदत केल्याने गरजूंच्या शिक्षणाला हातभार लागला आहे. दानशुरांनी केलेल्या मदतीच्या माध्यमातून वह्या आणि इतर शैक्षणिक साहित्य विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक बी.के.नाठे यांच्या हस्ते आणि मुख्याध्यापक अरुण पगार, सर्व शिक्षक कर्मचारीवर्गाच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आले. विद्यालयासह नासाकाचे अवसायक प्रदीप आव्हाड आणि नाशिक सर्व सेवाभावी ट्रस्टचे मानद व्यवस्थापक सुधाकर गोडसे यांनी दानशुरांचे आभार मानले.
