
नांदगाव (प्रतिनिधी )म.वि.प्र संचलीत न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव येथे ऑलिम्पिक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापिका श्रीमती काळे जे.आर . यांनी भुषविले.याप्रसंगी क्रिडा शिक्षक श्री . पी.यू.पाटील यांनी विद्यार्थांना हाँकी, हॉलीबॉल, , रनींग या खेळांविषयी माहिती सांगितली . तसेच या ऑलम्पिक दिवसाचं महत्त्व व हेतू विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. अध्यक्षीय भाषणात श्रीमती काळे मॅडम यांनी शिक्षणा इतकेच खेळ ही महत्त्वाचा आहे . खेळाच्या माध्यमातूनही आपण जीवन यशस्वी करू शकतो हे विद्यार्थ्यांना पटवून दिले . कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
