
सटाणा:( वार्ताहर)मराठा इंग्लिश स्कूल येथे दिनांक २३ जून रोजी जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे शिक्षक श्री.शेखर दळवी सरांनी केले.कार्यक्रमाचे उद्घाटन मा. मुख्याध्यापक श्री. विनायक बच्छाव सरांच्या हस्ते ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित करून करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना ऑलिम्पिक चळवळीचे महत्त्व सांगत खेळ व क्रीडा संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले. यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांच्या “ऑलिम्पिक वॉक” मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करून दिली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. ऑलिम्पिक डे निमित्त आयोजित केलेल्या वॉक मध्ये विद्यार्थ्यांनी ऑलिम्पिक मूल्यांना अनुसरून संघभावना, चिकाटी व क्रीडा संस्कारांचे दर्शन घडवले.कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री. पाटील के.एन.सर यांनी केले होते. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि उपस्थित होते.
