
नाशिक [ साहेबराव नंदन तात्या ] राष्ट्रीय कीर्तनसम्राट डॉ.प्रा. सिन्नरकर महाराज यांच्या पुण्यभूमीत कवी संगीतकार योगेश जाधव यांच्या “पिंपळ” या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा थाटात संपन्न झाला. या सोहळ्याचं उदघाटन माननीय डॉ.भूपाल देशमुख यांच्या हस्ते झाले, कार्यक्रमाचे अध्यक्ष सुहास टिपरे होते..तर प्रमुख पाहुणे म्हणून कीर्तनचंद्रिका वैजयंती सिन्नरकर, संजय आहेर, अलकसम्राट सुभाष उमरकर हे उपस्थित होते.प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम मान्यवरांचा श्री योगेश जाधव यांनी शाल गुलाबपुष्प व पेन देऊन सत्कार केला. तर वैजयंती सिन्नरकर यांना साडी गुलाबपुष्प व पेन देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.योगेश जाधव यांनी आपल्या मनोगतात म्हटले की वास्तव लिखाण्यापेक्षा काल्पनिक लेखनात आणि तेही नैसर्गिक लेखन करण्यात जास्त मजा आहे. कारण नैसर्गिक लेखन हे आपल्याला निसर्गाकडून प्राप्त होते आणि निसर्गाने आपल्याला जे काही दिलं आहे ते भरभरून दिलं आहे त्यामुळे आपण निसर्गावर लिहिले पाहिजे.. पिंपळ काव्यसंग्रहाची महती सांगताना जाधव म्हणाले की गेल्या ४० वर्षापासून मी माझ्या खिडकीतुन पिंपळाचे झाड पाहतो आणि त्यातूनच मला माझ्या काव्यसंग्रहास पिंपळ हे नाव देण्याचे सुचले सुहास टिपरे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की माणसाने ध्येय ठरवले की ते पूर्ण होते व योगेश जाधव हे निसर्गावर प्रेम करणारा अवली आहे त्यामुळेच त्यांनी आपल्या काव्यसंग्रास पिंपळ नाव देऊन आपले ध्येय सार्थ केले व निसर्गा बद्दल कृतज्ञता व्यक्त केली..डॉ.भूपाल देशमुख, वैजयंती सिन्नरकर, संजय आहेर, सुभाष उमरकर सर्व मान्यवरांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण मेतकर यांनी केले तर आभार वैजयंती सिन्नरकर यांनी मानले. वाढदिवसाच्या ओट्यावर साहित्यिकांचे वाढदिवस साजरे करण्यात आले, यांनंतर कविसंमेलनात कविंनी आपल्या कविता सादर केल्या.याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. अलकाताई दराडे, अजय बिरारी , निशांत गुरु, विलास पंचभाई,रतन हिरे, सोमनाथ पगार , निजामपूरकर सर, कविता कासार, भाऊसाहेब , गोरख पालवे, घोडेराव सर जादूगार तुषार कन्नडकर, क्षितिजा खटावकर, सोनाली भट आदी मान्यवर उपस्थित होते नाष्टा चहापाणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
