
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९४५ वा दिवस कित्येक गोष्टी अद्याप आपल्याला करावयाच्या आहेत, परंतु आवश्यक त्या साधनांचा देशात अभाव आहे. आपल्यापाशी बुद्धिमत्ता आहे, पण कर्मशीलता नाही. वेदांत तत्वज्ञान आहे, परंतु ते व्यवहारात उतरविण्याचे सामर्थ्य आपल्यात नाही. आपल्या धर्मग्रंथातून वैश्विक समतेचा सिद्धांत प्रतिपादिलेला आहे, परंतु प्रत्यक्ष कार्यात आपण पुष्कळच भेदाभेद पाळतो. भारतात अत्युच्च प्रकारच्या निःस्पृह आणि निःस्वार्थ कार्याचा महिमा उपदेशिला गेला आहे, परंतु प्रत्यक्ष व्यवहारात आपण भारतीय अत्यंत निर्घृण, अत्यंत निर्दयी बनतो. व्यवहारात आपल्या रक्तामासाच्या शरीरापलीकडे आपण विचारच करू शकत नाही. स्वामी विवेकानंद… ●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २ आषाढ शके १९४७*
★ जेष्ठ वद्य /कृष्ण १३
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ सोमवार दि. २३ जून २०२५
★ १७६१ बाळाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवे यांचा स्मृतिदिन.
★ १९५३ भारतीय जनसंघाचे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा स्मृतिदिन.
★ १९२७ मुंबई येथे भारतीय नभोवाणी केंद्राची स्थापना
★ १९८० पंतप्रधान इंदिरा गांधींचे सुपुत्र संजय गांधी यांचा स्मृतिदिन
★ विश्व ऑलिंपिक दिन
★संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिन
★ टंकलेखन दिन.
