
नाशिक- (प्रतिनिधी)- सिद्धार्थ कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मुंबई -1 येथील सेवानिवृत्त प्रा. संजय सुतार माजी उपप्राचार्य यांनी आपल्या सेवा काळात केलेल्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल नागपूर येथील शेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालय कामठी या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात सेवानिवृत्त शिक्षक व गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला

राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषद महाराष्ट्र राज्य द्वारा परिषदेचा पाचवा वर्धापन दिन,सेवानिवृत्त शिक्षक गुणगौरव, गुणवंत विद्यार्थी गुणगौरव हा कार्यक्रम नुकताच दिनांक 9/6/ 2025 सोमवार रोजी आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य विनय चव्हाण तसेच संस्थापक अध्यक्ष प्रा. सुमित पवार, उपाध्यक्ष प्राचार्य शरद जोगी सर, सहसचिव प्रा.डॉ. सुनील राठोड सर, नागपूर विभागातील अध्यक्ष प्रा. डॉ.सुधीर अग्रवाल नागपूर विभागाचे पालक प्रा.प्रमोद कारमोरे विभागीय महासचिव प्रा.पद्माकर सावरकर प्रा.संध्या येलेकर यांच्या उपस्थितीत सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात आले.

प्रा. संजय सुतार यांना सेवानिवृत्त शिक्षकगौरव पुरस्कार केल्याबद्दल राज्यशास्त्र परिषद नाशिक विभाग तर्फे विभागाचे पालक व उपाध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक सुरेश नारायणे सर विभागीय अध्यक्ष प्रा.नाना सोनवणे महासचिव प्रा.अमोल अहिरे जिल्हाध्यक्ष व कार्यकारणी सदस्य आणि गणतंत्र न्यूज चैनल तर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा देण्यात येत आहे.
