
नांदगाव (प्रतिनिधी )नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालय सध्या रुग्णांसाठी उपचार केंद्र लाचारी आणि दुर्लक्ष याचे स्मारक बनले आहे. औषधांचा आणि सुविधांचा संपूर्ण अभाव असून सध्या या रुग्णालयात डी. टी. इंजेक्शन, बी. पी.व शुगरच्या गोळ्या, खोकल्याचे सिरप, डायक्लोझल इंजेक्शन, आय. व्हि. सेट यासारख्या अत्यावश्यक औषधांचाही तुटवडा आहे.”रुग्णालय ओसाड आणि निष्क्रिय”या ग्रामीण रुग्णालयातील ओपीडी आणि वार्ड पूर्णपणे रिकामे असून ऑपरेशन थिएटर मध्येही एकही उपचार नाही. रुग्ण नाहीत, डॉक्टरांची उपस्थिती नाही. सेवाभाव नाही. प्रशासनाचा कानाडोळा नाशिक जिल्ह्याचे शल्य चिकित्सक डॉक्टर शिंदे यांच्याकडे वारंवार तक्रारी देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. रुग्णांचा सवाल आरोग्य मंत्री केव्हा जागी होतील? नांदगावकरांना आरोग्य सेवा मिळणार की नाही? नांदगाव शहरात संताप वाढतोय प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जनतेमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून सामाजिक संघटना आणि जनप्रतिनिधी आता एकत्र येत असून जर लवकर उपायोजना न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.”न्याय नसेल, तर संघर्ष अटळ!” असा सूर आहे. तसेच

नांदगाव तालुक्यातील जामदरी येथील गर्भवती महिलेला नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करून न घेता तिला दिवसभर ग्रामीण रुग्णालयाच्या बाहेर बसून ठेवण्याचा धक्कादायक प्रकार दिनांक 21 जून 2025 रोजी शनिवारी समोर आला. सदर घटना समजल्यानंतर युवा सेनेचे जिल्हाप्रमुख फरहान खान यांनी डॉक्टरांना जाब विचारल्यानंतर सदर महिलेची सुखरूप प्रसुती झाली. दरम्यान रुग्णालयाच्या या आक्षेपार्य कृतीबाबत नांदगाव तालुक्यातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. नांदगाव तालुक्यातील जामदरी येथील एका गर्भवती महिलेला दिनांक 21 जून 2025 रोजी शनिवारी सकाळी दहा वाजता तिच्या नातेवाईकांनी प्रसूतीसाठी नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र वेगवेगळे कारणे देत त्या महिलेला प्रसूतीसाठी दाखल करून न घेता सदर महिलेला दिवसभर ग्रामीण रुग्णालयाच्या बाहेर बसवून ठेवण्यात आले. दर महिन्याचे सिजर करावे लागणार असल्याचे सांगत त्यासाठी डॉक्टर उपलब्ध नसल्याचेही कारण देण्यात आले. सदर बाप युवासेनेचे प्राण खान यांना समजल्यानंतर त्यांनी डॉक्टर शांताराम राठोड यांच्या सदर महिलेच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. त्यानंतर रात्री दहा ते अकरा वाजेच्या सुमारास सदर महिलेची प्रसूती सुखरूप झाली. त्या महिलेला कन्यारत्न प्राप्त झाले. दरम्यान नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी सदर मुलीच्या संगोपनासाठी 21 हजार रुपये देण्याची जाहीर केले. मात्र नांदगाव ग्रामीण रुग्णालयाचे व्यवस्थापनाच्या निष्क्रिय कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
