
ॲड.अरनांदगाव(प्रतिनिधी) नांदगाव जिल्हा नाशिक येथील ॲड अर्चना आढाव यांना संस्कृती मंत्रालय, राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय तसेच युनि जी आय एफ आयोजित वार्षिक शिक्षण समिट 2025 अंतर्गत महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर सन्मान 21 जून 2025 रोजी नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट्स, फोर्ट, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाकरिता प्रमुख अतिथी ॲड मंगल प्रभात लोढा -कौशल्य ,रोजगार, उद्योजकता मंत्री, श्री प्रेम शुक्ला वरिष्ठ भाजप नेता ॲड आशिष शेलार व आयएएस ऑफिसर निधी चौधरी – भारतीय संस्कृती मंत्रालय हे उपस्थित होते. तसेच डॉक्टर रचना भीमराजका मॅडम-युनिक ग्लोबल इंटेलेक्चुअल संस्था चेअरमन, बिपिन गुप्ता- सृष्टी फाउंडेशन डायरेक्टर मुंबई तसेच डॉक्टर सरिता गोम्स एम व्ही आय हायस्कूल प्राचार्य हे उपस्थित होते. विविध क्षेत्रातील मान्यवरांना महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक विभागातून ॲड अर्चना आढाव यांचे मातृभाषेतून इंग्रजीकडे हे 16 भाषिक पुस्तकास अनुसरून शैक्षणिक क्षेत्रात महाराष्ट्र रत्न सन्मान हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्याबद्दल सर्व स्तरातून ॲड आढाव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर अनिता गुप्ता यांनी केले.
