
निगडोळ (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेचे,मा.श्री.शरदरावजी पवार माध्य.विद्यालय निगडोळ ता.दिंडोरी जि.नाशिक.या ज्ञानसंकुलात शनिवार दि.२१जून २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला. विद्यालयाचे मा.मुख्याध्यापक श्री.बोरसे डी.डी यांच्या मार्गदर्शनानुसार ज्येष्ठ शिक्षक श्री.कापडणीस एन.जे.यांनी योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले.विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी योगासनाचे व प्राणायनाचे विविध प्रकार सामुदायिकरित्या केले.त्यानंतर ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती.गायकवाड पी.व्ही.यांनी विद्यार्थ्यांना योगासने व प्राणायनाचे महत्व आपल्या मनोगतातून पटवून दिले. याप्रसंगी निगडोळ पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमी ग्रामस्थ व सर्व रयत सेवकवृंद उपस्थित होते. श्री.कापडणीस एन.जे.यांनी उपस्थितांचे आभार मानले.योग दिनाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व रयत सेवकवृंदांचे अनमोल सहकार्य लाभले.
