
मुळ डोंगरी ( प्रतिनिधी ) सरस्वती माध्यमिक विद्यालय मूळ डोंगरी येथे 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा. श्री संत सेवालाल महाराज सेवाभावी संस्था संचलित सरस्वती माध्यमिक विद्यालय मूळ डोंगरी येथे जागतिक योग दिन पृथ्वीवरील 21 जून हा दिवस म्हणजे सर्वात मोठा दिवस योग दिवस म्हणून साजरा केला जातो. याप्रसंगी विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष एस. जी .राठोड साहेब व सचिव सिद्धार्थ दादा राठोड व विद्यालयातील मुख्याध्यापिका सौ बोरसे एस. एस. मॅडम यांच्या मार्गदर्शनाने योग दिनानिमित्त विविध असणे प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक करण्यात आले

याप्रसंगी विद्यालयातील सहशिक्षक श्री जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना योग व प्राणायामाचे महत्त्व समजून सांगितले . याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी प्रात्यक्षिक प्रयोग करून कार्यक्रमात सहभाग घेतला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील जाधव सर यांनी केले व प्रात्यक्षिक श्रीमती बागुल मॅडम श्रीमती भामरे मॅडम व शेलार सर व निकम सर यांनी केले.

